सियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी निघताना घात झाला, महाराष्ट्राच्या सुपुत्राचा दुर्दैवी मृत्यू

बुलडाणा। बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील कैलास भारत पवार यांना ३१ जुलै रोजी काश्मिर क्षेत्रात वीरमरण आलं. ते १० महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. अवघ्या २२ वर्षात त्यांना वीरमरण आलं आहे.

सियाचीन या अत्यंत खडतर ठिकाणी कर्तव्य बजावताना बर्फाळ डोंगरावरून पाय घसरून ते खाली कोसळल्यामुळे त्यांना वीरमरण आले. कैलास पवार हे २ ऑगस्ट २०२० पासून हिमालय पर्वत रांगेत असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये कर्तव्य बजावत होते.

त्याची सियाचीनमधील एक वर्षाची ड्युटी १ ऑगस्टला संपली. त्यामुळे ते सहा महिन्यांच्या सुट्टीवर घरी येणार होते. ते आपल्या सहकार्यासह कैलास सियाचीन ग्लेशियरच्या बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत होते. मात्र त्याच दरम्यान आपल्या सहकाऱ्यांसह बर्फाळ डोंगरावरून खाली उतरताना पाय घसरला आणि ते खाली कोसळले.

सोबत असलेल्या जवानांनी शक्य तेवढे लवकर त्याला तेथून हलवले आणि उपचारासाठी लडाखच्या इस्पितळात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान दि. १ ऑगस्ट रोजी कैलास पवारची प्राणज्योत मालवली. दिवंगत जवान कैलास पवार यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर ४ ऑगस्ट लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र त्यांच्या अचानक ज्याण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिमालयाच्या संरक्षणासाठी बंदोबस्तावर तैनात असलेल्या आपल्या सुपूत्राचा त्याच हिमालयाने असा घात का केला, त्याला आपल्यापासून कायमचे दूर का नेले ? हा वेदनादायी प्रश्न कैलासच्या कुटुंबियांना पडलाय.

देशाच्या रक्षणासाठी जवान आपले तन, मन, धन संपूर्ण आयुष्य भारतमातेला अर्पण करतात. कित्येक वर्ष ते शत्रूंशी लढा देतात. भारतभूमीच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाचे बलिदान देण्यासाठी प्रत्येक सैनिक सदैव तत्पर असतो. मात्र याच हिमालयाच्या कुशीत कैलास यांना वीरमरण आले आहे.
महत्वाच्या बातम्या
MPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षेचं आयोजन
शाकाहार समजून मांसाहार तर करत नाहीत ना? जाणून घ्या ‘या’ पदार्थांमध्ये आहे मांसाहारी घटक
दारूच्या नशेत तरुणीने पुण्यात भररस्त्यात झोपून, आरडाओरड करुन घातला धिंगाणा, पाहा व्हिडिओ
धक्कादायक! तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत टवाळखोरांकडून तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.