Homeताज्या बातम्यागल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांकडून आता वर्ल्डकप जिंकण्याची भाषा, मलिकांचा राणेंवर हल्लाबोल

गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांकडून आता वर्ल्डकप जिंकण्याची भाषा, मलिकांचा राणेंवर हल्लाबोल

नारायण राणेंसारखे भित्रे मंत्री राहिले नाहीत. राणे घाबरले म्हणून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांना काही बक्षिस मिळाले नाही म्हणून काहीही बोलतात अशी टीका राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलेल्या टीकेला नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे.

नवाब मलिक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की,भाजप जिल्हा बँक परिषदेच्या निवडणूक जिंकलं नाही. जिल्हा बँकेत २२ ते ३० मतदारांचं अपहरण करून, पैसे देऊन मग बँक जिंकणे. त्यानंतर राज्य जिंकू असं आवाहन करत आहेत. म्हणजे गल्लीत क्रिकेट जिंकल्यानंतर वर्ल्ड कप जिंकण्याची भाषा करत आहेत, असं नवाब मलिक म्हणाले.

काय म्हणाले होते नारायण राणे
नवाब मलिक यांना राष्ट्रवादीने सोडून दिले आहे. त्यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांच्या जावयाकडे काय मिळाले हे सर्वांना माहित आहे. तरीही नवाब मलिक बोलत आहेत. आघाडीचे अनेक मंत्र्यांना अटक होणार आहे. त्याची चिंता कर डायलॉगबाजी करु नका,” असे नारायण राणे यांनी म्हटले होत. त्यानंतर आता मालिकांनी राणेंचा समाचार घेत जिल्हा बँकेच्या विजयावर टीका केली आहे.

अजित पवारांच्याही टीकेला दिले उत्तर
कोण अजित पवार?, हे त्यांनी ओळखण्याची गरज नाही. कोण अजित पवार, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. ज्याप्रकारे हे महाराष्ट्र जिंकण्याची भाषा करत आहेत. तसेच सत्ता परिवर्तन करू असं म्हणत आहेत. परंतु भाजप स्वप्न पाहत आहेत आणि राणे स्वप्न पाहणारा व्यक्ती म्हणून निर्माण झाला आहे असे म्हणत मालिकांनी तेथे राणेंना डिवचले.

आता भाजपा यंत्रणेचा वापर करुन लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम करत असेल तर आम्ही घाबरणार नाही. जे घाबरत होते त्यांनी पक्ष सोडला. त्यांना बक्षिसपण मिळाले असेल. पण हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि २५ वर्षे हेच सरकार राहिल हे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले होते. जे भित्रे तिकडे गेले त्यांना झोप येते आणि आम्ही लोकांची झोप उडवतो,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

फर्जीवाड्याचा माझा लढा सुरु राहील, हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे, अशा प्रकारचं नवीन ट्विट नवाब मलिकांनी केलं आहे. १८ कोटींची डील ५० लाखांची वसुली याचा काय अहवाल आला आहे ? जनतेच्या पैशांवर अधिकारी लोक पैसे वाया घालवतात हे कधीपर्यंत चालणार आहे ? आम्ही कोर्टाची लढाई लढू. सत्य समोर येईल. भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा होणारच आहे. शेवटपर्यंत माझा लढा सुरु राहील, असं मलिक म्हणाले.

ताज्या बातम्या
पेट्रोल पंपावर जाताना घ्या ‘या’ ५ गोष्टींची काळजी, कधीच होणार नाही फसवणूक
मंदिराच्या दानपेटीत कंडोम टाकायचा अन् पळून जायचा; पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर म्हणाला…
दोन मुलांचा बाप असणाऱ्या या सुपरस्टारच्या प्रेमात पडली रश्मिका? नाव वाचून हादराल
…अन् बॉयफ्रेंड अर्जून कपूरच्या नादात मलायका आपल्या मुलालाच विसरली; पहा हैराण करणारा व्हिडिओ   

 

ताज्या बातम्या