“काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली, जय मल्हार”

पुणे । भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे पवार कुटुंबावर सतत टीका करत असतात. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सतत टीका करत असतात. यामुळे ते चर्चेत असतात. आता जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाचे आभार मानत त्यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे.

यामुळे चर्चा सुरू झाली आहे, आता येथील जमिनी संदर्भात माहिती देऊन त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते म्हणाले, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत, श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली.

आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे. ।। यळकोट यळकोट जय मल्हार ।। असे ट्विट पडककरांनी केले आहे. यामुळे आता चर्चा रंगू लागली आहे. त्यांचे हे ट्विट सगळीकडे व्हायरल होत आहे. यामुळे या जमिनीचा काय वाद आहे, हे पुढे येणार आहे.

यामध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा निशाणा हा पवार कुटूंबावर असल्याचे दिसून येत आहे. आता ते या जमिनीबाबत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही महिन्यांपूर्वी जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुनही त्यांनी मोठा वाद घातला होता.

जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र, उद्घाटनादिवशीच अचानक पहाटे गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याचे गोपीचंद पडळकर यांनी जाहीरही केले होते. त्यावेळी देखील त्यांनी पवारांवर जोरदार टीका केली होती. आता पुन्हा एकदा हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.