काँग्रेसने ज्यांना जमीन दिली, त्यांनीच तिथे डाका मारला, पटोलेंचा शरद पवारांवर जोरदार हल्ला

मुंबई । काँग्रेस नेते नाना पटोले अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे विधान करून चर्चेत असतात. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले आहे. यामुळे आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील जमीनदारांसारखी झाली आहे, असे शरद पवार म्हणाले होते.

आता यावर नाना पटोले यांनी काँग्रेसने अनेकांना जमीन राखायला दिली. मात्र ज्यांना ती जमीन राखण्यासाठी दिली त्यांनीच त्यावर डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असे म्हणत शरद पवारांवर जोरदार हल्ला केला आहे.

यामुळे चर्चा सुरू झाली आहे, शरद पवार यांनी काँग्रेसच्या आजच्या परिस्थितीबद्दल भाष्य केले होते. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे बरीच मोठी शेती आहे. त्यांच्याकडे गावामध्ये हवेली मोठी घरे आहेत. मात्र त्याचवेळी सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या हजारो एकर जमिनी गेल्या.

असे असले तरी पण हवेली आहे, आणि ती तशीच आहे. आता या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे, असे पवार यांनी म्हटले होते. यामुळे काँग्रेसने आता त्यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आक्रमक भूमिका घेत आहेत. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून अनेकदा त्यांनी आता काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.