लालुप्रसाद यादवांच्या प्रकृतीबाबत गंभीर माहिती आली समोर; वाचून धक्का बसेल

चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती ढासळली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून फुफ्फुसात पाणी झालं असून चेहऱ्यावर सूज आली आहे. तसेच त्यांना श्वास घेण्याचाही त्रास होत आहे.

चारा घोटाळा प्रकरणात तुरूंगवास भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावर मागील काही महिन्यांपासून रांचीतील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे.

लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली असून, प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी वडिलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली.

लालू प्रसाद यांच्या फुप्फुसात संसर्ग झाला असून श्‍वास घेण्यास अडथळा येत आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरी चांगल्या उपचारांची गरज असल्याने त्यांना ‘एम्स’मध्ये पाठविण्याची शिफारस रांचीच्या ‘रिम्स’ रुग्णालयातील वैद्यकीय मंडळाने केली होती. त्यानंतर त्यांना रांचीहून हवाई रुग्णवाहिकेने दिल्लीतील एम्स शनिवारी हलविले आहे.

पेट्रोलपंपावर हवा भरण्यासह ‘या’ सुविधा मिळतात मोफत; कुणी देत नसेल तर ‘अशी’ करा तक्रार

नेता असावा तर असा! ‘बैठक घेतली रानात अन् वाद मिटवला क्षणात’

इंग्रजी येत नाही म्हणून मुलाखती सोडून पळून आला होता ‘हा’ अभिनेता; आज आहे सुपरस्टार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.