लालूप्रसाद यांनी शरद पवारांची घेतली भेट, भेटीचे कारण सांगताना लालूप्रसाद म्हणाले..

राजकारणात वेगवेगळ्या घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचे देखील दिसून येत आहे. सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधी विरोधी पक्षांची एकजूट बांधताना दिसत आहेत.

या भेटीगाठींमागे उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका असल्याचेही बोलले जात आहे. राजदचे नेते लालू प्रसार यादव हे दिल्लीत असून, त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. या सर्व दौऱ्यासंदर्भात बोलताना लालू प्रसाद यादव यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीबद्दलही भाष्य केले.

लालू प्रसाद यादव म्हणाले की, लोक जनशक्ती पार्टीमध्ये जे काही घडले. त्यानंतरही मला असे वाटते की, चिराग पासवान हेच लोजपाचे नेते आहेत. अशी भूमिका त्यांनी मांडली. चिराग पासवान-तेजस्वी यादव एकत्र येण्याबद्दल ते म्हणाले, हो मला वाटते ते एकत्र येतील. आम्ही बिहारमध्ये सरकार स्थापन करणार होतो.

मी तुरूंगात होतो, पण माझा मुलगा तेजस्वी त्यांच्याशी (भाजपा-जदयू) एकटा लढला. त्यांनी धोका दिला, आम्हाला १०-१५ मतांनी हरवले. असे मत लालू प्रसाद यांनी मांडले. पुढे ते म्हणाले, शरद पवार यांची प्रकृती बरी नव्हती. मी त्यांना भेटण्यासाठी आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो.

शरद पवारांशिवाय संसद शांत वाटत आहे. मी, शरद पवार आणि मुलायम सिंह यादव असे आम्ही तिघे खुप वर्ष वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी राजकीय लढा दिला. काल मी मुलायम सिंह यादव यांचीही सदिच्छा भेट घेतली, असे लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

‘आम्ही पॅकेज वाले नाही, असे बोलणाऱ्यांनीच आज पॅकेज जाहीर केले’

सात टाके पडल्यानंतरही मागे नाही हटला हा पठ्ठ्या, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरशी नडला, पण…

डायबिटीज आणि कर्करोगापासून वाचण्यासाठी भेंडीचा करा अश्याप्रकारे वापर; तज्ञांनी दिला सल्ला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.