लालबागच्या राजाने भक्तांना दिलं पहिलं दर्शन; पहा अमिताभ बच्चनने शेअर केलेला व्हिडिओ

बाप्पांच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच लागलेली आहे, मग तो सामान्य माणूस असो वा सेलिब्रीटी. जसा जसा आगमनाचा दिवस येत आहे, तशी तशी गणेश भक्तांची उत्सुकताही वाढत चालली आहे. अशातच गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

२०२१ चा गणेशोत्सव सुरु होण्याआधीच लालबागचा राजा विराजमान झाला आहे. इतकंच नाही, तर लालबागच्या राजाने आपल्या भक्तांना पहिले दर्शनही दिले आहे. याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आता अमिताभ बच्चन यांनीही लालबागच्या राजाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी व्हिडिओ शेअर करुन फक्त काहीच तास झाले असले तरी या व्हिडिओला आतापर्यंत १९ लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे.

 

राज्यात गणेशोत्सव उत्सव हा जल्लोषात साजरा केला जातो. हे १० दिवस सर्वच गणेश भक्त उत्साहात असतात. घर असो वा सार्वजनिक गणेश मित्रमंडळ प्रत्येक ठिकाणी मुर्तीची स्थापना केली जाते. सर्व भक्त १० दिवस भक्तीभावाने पुजा करताना दिसतात.

दरवर्षी गणेशोत्सवासाठी सर्वचजण आतुरतेने वाट बघत असतात. पण सध्या कोरोना काळामुळे अनेक गोष्टींना मर्यादा आल्या आहे. गेल्यावर्षी आलेल्या कोरोनामुळे राज्य सरकारने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याच्या सुचना दिल्या होत्या, त्यामुळे भक्तांना आपल्या बाप्पाचे आगमन जल्लोषात साजरा करताना अनेक गोष्टींमध्ये मर्यादा आल्या होत्या.

कोरोनाचा धोका अजूनही पुर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे यावर्षी सर्व भक्तांना बाप्पाचे ऑनलाईन दर्शन करता येणार आहे. दरवर्षी लालबागच्या राजाला मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यामुळे ऑनलाईन दर्शनाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी ५ किलोमीटरपर्यंत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी रांग लागायची पण कोरोनामुळे भक्तांच्या दर्शनावर काही बंधने आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.