लक्ष्मीकांत बेर्डेची लेक स्वानंदीने ठेवले नव्या व्यवसायात पाऊल; जाणून घ्या तिच्या नवीन व्यवसायाबद्दल

सोशल मीडियावर स्टार कीड म्हणुन चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे स्वानंदी बेर्डे. सुप्रसिध्द दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक चित्रपटसृष्टीत पदार्पण होण्याआधीच सर्वांची लाडकी ठरली.

अभिनयासोबत अनेक अभिनेत्री व्यवसाय करताना आपण पाहत आलो आहे. अलीकडेच आपण “रात्रीस खेळ चाले” मधील अपूर्वा नेमळेकरने सुद्धा apurva’s collection हा व्यवसाय सुरू केला आहे. अपूर्वा नेमळेकर प्रमाणेच अभीज्ञा भावे, तेजस्विनी पंडित, निवेदिता सराफ असे अनेक कलाकारांचा व्यवसाय आहे.

स्वानंदीने तीची खास मैत्रीण सायली गवळी हिच्या मदतीने “Ehaas collection” या नावाने कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. यामध्ये साड्या, ड्रेस मटेरियल, तसेच आर्टिफिशियल ज्वेलरीचा समावेश आहे. लवकरच याबाबतीत अधिक माहिती देऊ, असं स्वानंदी म्हणाली.

सेलिब्रिटींची मुलं आपल्या आई वडीलांच्या पावलावर पाऊल ठेऊनच चित्रपटसृष्टीत पदार्पण करतात ही नवीन गोष्ट नाही. तसेच स्वानंदी बेर्डेनेही “रिस्पेक्ट” या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. स्टार किडच्या यादीत स्वानंदीचे नाव आघाडीवर आहे.

नुकतेच तिने ‘धनंजय माने इथेच राहतात का ‘ या नाटकातून नाट्य क्षेत्रात पहिले पाऊल टाकले होते. या नाटकातून तिने सौ माने ची भूमिका निभावली होती. अभिनय आणि व्यवसाय अशा दोन्ही जबाबदाऱ्या ती पार पाडताना दिसणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या
अटक करा, नजरकैदेत ठेवा, काहीही करा; मी ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणणारच
बिग ब्रेकींग! पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह यांची निवड, राज्याला मिळणार पहिला दलित मुख्यमंत्री
“सोमय्यांना कोल्हापूरी हिसका दाखवणार, त्यांचा हा शेवटचा स्टंट असेल”
७ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेण्याचा मोदींचा गुण मला सर्वांत जास्त आवडतो: प्रीतम मुंडे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.