भाजपला मोठे खिंडार; एकाच वेळेस १५ भाजप नेत्यांनी दिला राजीनामा

पश्चिम बंगालच्या निवडणूकीत झाल्यालेल्या पराभवामुळे भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यानंतर अनेक भाजप नेते भाजपला रामराम ठोकताना दिसत आहे. अशातच भाजपला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

लक्षद्वीपमध्ये भाजपचे १५ नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. फिल्ममेकर आयशा सुल्ताना विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनाम्यानसारखे टोकाचे पाऊल उचलेले आहे.

लक्षद्वीप भाजप अध्यक्ष सी अब्दुल खादर हाजी यांनी आयशा सुल्तानाविरोधात राजद्रोहाची तक्रार दाखल केली होती, असे वृत्त एएमआयने दिले आहे. आयशावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याने भाजपमध्ये दुफळी निर्माण झाल्याने १५ नेत्यांनी राजीनामा दिला आहे.

आयशा ही लक्षद्वीपची पहिली महिला फिल्ममेकर आहे. शुक्रवारी तिच्यावर कावारत्ती पोलिस स्टेशनमध्ये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका टिव्ही शोमध्ये आयशाने लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे निर्णय आणि कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरुन टीका केली होती.

आपल्या चेथलातच्या बहिणीविरोधात खोटी आणि अयोग्य तक्रार दाखल करण्यात आले आहे. आम्हाला यावर आक्षेप आहे आणि आम्ही राजीनामा देत आहे, असे भाजपचे सचिव अब्दुल हमीद यांनी म्हटले आहे.

याप्रकरणी १२ भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वाक्षरीचे पत्र अब्दुल खादर यांना पाठवले आहे. त्या पत्रात लिहिले आहे की, भाजपला हे माहित आहे की प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे निर्णय जनविरोधी, लोकशाही विरोधी असून सर्व नागरीक या निर्णयांना त्रासले आहे.

महत्वाच्या बातम्या-

पाच वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहणार कारण…, संजय राऊत यांचा विश्वास
जया बच्चनने संजीव कुमारला भिकारी समजून सेटवरुन काढले होते बाहेर; वाचा पुर्ण किस्सा
शिल्पाच्या नंदेनेही दिली भावाची साथ, राजच्या पहिल्या पत्नीबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.