भारतातही आहे एक बर्म्युडा ट्रँगल; इथे जो कोणी गेला तो कधीच परत नाही आला

जगभरात काही ठिकाणी खुप रहस्यमयी असतात. त्यातलेच एक ठिकाण म्हणजे बर्म्युडा ट्रँगल. भारतात बर्म्युडा ट्रँगलची नेहमीच चर्चा होत असते. असे म्हटले जाते या ठिकाणी जाणारा व्यक्ती कधीच परत येत नाही. तसेच बर्म्युडा ट्रँगलच्या वरुन जाणारी विमाने, पाण्यातून जाणाऱ्या जहाजाही परत आल्या नाही, याचे अनेक पुरावेही आहे.

आता असाच बर्म्युडा ट्रँगल भारतातही आहे. भारत आणि म्यानमारच्या सीमेजवळ असाच एक तलाव आहे. याला ‘लेक ऑफ नो रिटर्न’ म्हणून ओळखले जाते. काही रहस्यमयी घटनांमुळे हा तलाव चर्चेचा विषय राहिला आहे. असेही म्हटले जाते की जो कोणी आजपर्यंत या तलावाजवळ गेला तो परत कधीच येऊ शकला नाही.

या तलावाच्या रहस्याबद्दल काही कथाही जोडल्या गेलेल्या आहे. या तलावाला नाव नौंग यांग तलाव असेही म्हणतात. हे अरुणाचल प्रदेशात आहे. असे मानले जाते की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, अमेरिकन विमानांच्या वैमानिकांनी सपाट जमीन गृहीत धरून येथे एमरजेंसी लँडिंग केले, पण त्यानंतर विमान वैमानिकांसह अतिशय रहस्यमयपणे गायब झाले.

इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार, जेव्हा जपानी सैनिक युद्ध संपल्यानंतर घरी परतत होते. त्यामुळे या तलावाजवळ आल्यानंतर त्यांचाही मार्ग चुकला आणि तेही गायब झाले. अशात काही लोकांचा असा विश्वास आहे की त्या जपानी सैनिकांना मलेरिया झाला होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.

आजूबाजूची गावातील लोक या तलावाच्या रहस्याशी संबंधित आणखी एक कथा जोडली जाते. बऱ्याच वर्षांपूर्वी एका गावकऱ्याने एक मोठा मासा पकडला होता. त्याने संपूर्ण गावाला मेजवानीसाठी आमंत्रित केले.

यावेळी त्या माणसाने फक्त एका आजीला आणि तिच्या नातीला बोलावले नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या या तलावाचे देवताने आजी आणि नात यांना गावापासून दूर जाण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे संपूर्ण गाव तलावात बुडाले. दरम्यान, अनेक संशोधकांनी या तलावाचे रहस्य शोधण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहे, पण आतापर्यंत केवळ अपयश प्राप्त झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

आयकर विभागाच्या धाडीनंतर पहील्यांदाच सोनू सूदने सोडले मौन; प्रतिक्रीया वाचून थक्क व्हाल
शेतकऱ्यांना चांगले पैसे देऊन सायकलवर विकला गूळ, आज २० कोटींचा टर्नओव्हर, २८ देशात विक्री..
“किरीट सोमय्यांच्या केसाला जरी धक्का लावाल तर दुसऱ्या दिवशी सरकार बरखास्त होईल”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.