लग्नाच्या वाढदिवसाला भेट दिलेला एक किलो सोन्याचा हार निघाला नकली; उडाली खळबळ

मे महिनात अनेक जणांचे लग्न झालेलं असतात. त्यामुळे या महिन्यात बऱ्याच जणांच्या लग्नांचा वाढदिवस पण आलेला असतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी पती आणि पत्नी एकमेकांना गिफ्ट देता असतात.

केमकांना मिळणाऱ्या गिफ्टबद्दल उत्सुकता पण असते. मात्र भिवंडीतील कोनगाव येथील एका पतीने त्याच्या पत्नीला चक्क एक किलोचा सोन्याचा हार गिफ्ट केला आहे. ह्या भेटीने त्या पत्नीला पण खूप आनंद झाला.

पत्नीने तिच्या पतीने हा हार दिल्यानंतरच व्हिडीओ सोशल मीडियावर पण टाकला होता. त्या हारबद्दल सोशल मीडियावर पण तर्क वितर्क लावले गेले. लॉकडाऊनमध्ये हा हार गिफ्ट केल्यामुळे सगळीकडूनच प्रश्न उपस्थित केले गेले.

भिवंडीतील तालुक्यातील कोन गाव येथील रहिवासी बाळा कोळी यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीला चक्क एक किलो वजनाचा सोन्याचा हार भेट दिला होता आणि त्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती.

मात्र पोलिसांनी मग बाळा कोळी यांना बोलावून हारची सुरक्षा कशी कराल असा प्रश्न विचारला. त्यासाठी बाळा कोळी यांनी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी बाळा कोळी यांनी हा हार खोटा असल्याचे सांगण्यात आले होते.

पोलिसांनी ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन पण त्या हारची चौकशी केली पण तो हार नकली असल्याचे मालकाने सांगितले. त्या हरची किंमत फक्त ३८,००० रुपये होती. नागरिकांनी सोन्याचे फोटो टाकून कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन करू नये असे पोलिसांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या
६०० तलवारी, लोखंडी तोफा, महालक्ष्मी मुर्ती; राजगडावर सापडला शिवकालीन खजिना

बंगालमध्ये पुन्हा घरवापसी, भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा तृणमूलमध्ये दाखल; भाजपवर डाव उलटला

सोनूने सगळ्यांचा भरोसा तोडत लावला चूना, १३ जणांशी लग्न करून चिक्कार लुटलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.