OMG! हेअर स्प्रे संपला म्हणून डोक्याला लावला गोरिल्ला ग्लु, पुढे जे झाले ते वाचून धक्का बसेल

आजच्या काळात लोक काय करतील काहीही सांगता येत नाही. सोशल मिडीयावर प्रसिद्ध होण्यासाठी आजकालची तरूण पिढी काहीही करण्यास तयार असते. अनेकदा त्यांच्या अशा विचित्र निर्णयांमुळे ते सोशल मिडीयावर ट्रोल होत असतात.

सोशल मिडीयावर फेमस होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करणे त्यांना खुप महागात पडते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र स्टंटबद्दल सांगणार आहोत. अमेरिकेतील लुयासियानातील रहिवासी असलेल्या टेसिका ब्राऊन नावाच्या तरूणीने हेअर स्प्रे संपला म्हणून आपल्या केसांना गोरिल्ला ग्लु म्हणजे चिकटवायचा गम लावला.

तुम्हाला वाचून गंमत वाटली असेल पण आज एक महिना झाला तरी या तरूणीचे केस नीट झालेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार टेसिका ब्राऊन यांनी फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातील एक खुलासा केला. तिचे केस स्काल्पला चिटकून एक महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे.

कारण तिने चुकून केसांना गोरील्ला ग्लु लावला होता. तिनं आपल्या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितले होते की, माझे केस जराही हालत नाहीत. तुम्ही ऐकत आहात ना मी काय बोलते आहे. या व्हिडीओमध्ये तिने शॅम्पूने केस धुतले तरी तिच्या केसांवर शॅम्पूचा कोणताही परिणाम होत नाही.

या व्हिडीओमध्ये ती म्हणाली की असे होईल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझा हेअर स्प्रे संपला होता त्यामुळे मी केसांना गोरिल्ला ग्लु लावला. मी ही खुप मोठी चुक केली आहे. आता माझे केस जरासुद्धा हलत नाही.

१५ वेळा धुवूनही केसांवर काहीच फरक पडला नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गोरिल्ला कंपनीने ट्विट केलं आहे की, या घटनेबाबत ऐकून आम्हाला खुप दु:ख झाले. कारण बाईंनी आमच्या स्प्रेचा उपयोग केंसावर केला आहे.

तुम्ही उपचार करून घेत आहात हे ऐकून आम्हाला आनंदही झाला आहे. आमची प्रार्थना तुमच्यासोबत आहे. गोरिल्ला ग्लु यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा ग्लु १०० टक्के वॉटरप्रुफ आहे. या ग्लुचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.

बाथरूमध्ये टाईल्स बसविण्यासाठी, वुडन फ्लोरिंगसाठी या ग्लुचा वापर केला जातो. हा ग्लु किती पॉवरफुल आहे याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. या स्प्रेचा वापर कोठेही करताना दहावेळा विचार करा.

आपल्या शरीराला याने कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घ्या. गंमती गंमतीमध्ये तुमच्या शरीराला खुप मोठे नुकसान होऊ शकते. सोशल मिडीयावर फेमस होण्यासाठी कसलेही विचित्र स्टंट्स करू नका. याचा तोटा तुम्हालाच होणार आहे.

महत्वाच्या बातम्या
प्रेग्नेंसीनंतर सपना चौधरीने धरला ताल; सोशल मिडीयावर व्हिडीओ घालतोय धुमाकूळ
हॉटेल आणि ट्रायल रूममधील छुप्या कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी वापरा या भन्नाट ट्रिक्स
‘आपके प्यार मैं’ गाण्यात हॉटनेसने आग लावणारी अभिनेत्री मालिनी शर्मा आज करते ‘हे’ काम
भाजपाची रणरागिणी कडाडली; ‘संजय राठोडांची चौकशी होत नाही, तोपर्यंत…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.