कारगिल युद्धात जीवाची बाजी लावत जवानांचे प्राण वाचवणारी रणरागिनी; वाचा थरारक किस्सा

१९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरू होते. भारत आणि पाकिस्तानची सेना समोरासमोर होती. दोन्ही बाजूने वारंवार फायरिंग होत होती. बरेच सैनिक जखमी झाले होते पण तरीही ते लढत होते. वायुसेनेचे सैनिकांना मदतकार्य आणि पाकिस्तानी सैनिकांचा सामना करण्याचे काम सुरूच होते.

पण एक वेळ अशी आली की, भारतीय वायू सेनेला कारगिलमध्ये बटालिक आणि द्रास घाटात अडकलेल्या जखमी जवानांना बाहेर काढण्यासाठी अजून एका पायलटची गरज होती. वायुसेनेचे सगळे पुरुष पायलट आधीपासूनच ड्युटीवर होते. मग वायुसेनेने आपल्या महिला पायलट्सला मदतीसाठी पाठवले. ही पहिली वेळ होती जेव्हा युद्धभूमीवर महिला पायलट्स गेल्या होत्या.

गुंजन सक्सेना यांचा जन्म अशा घरात झाला होता जिथे शिकवले जायचे की, आपल्या आधी आपल्या देशाला मानले जायचे. त्यांचे वडील आणि भाऊ भारतीय सेनेमध्ये कार्यरत होते. गुंजन या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हंसराज कॉलेजमध्ये शिकत होत्या जेव्हा त्यांनी फ्लाईंग क्लबमध्ये सामील झाल्या.

सुरुवातीला त्यांच्यासाठी हा फक्त एक व्होकेशनल कोर्स होता. पण नंतर त्यांना कळले की पहिल्यांदा वायुसेनामध्ये महिलांसाठी भर्ती निघाली आहे. मग त्यांनी SSB ची परीक्षा पास करून वायुसेनेत आपली जागा मिळवली. वर्ष १९९४ मध्ये भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला बॅचमध्ये त्या होत्या. या बॅचमध्ये त्यांच्यासोबत २३ महिला ट्रेनिंग घेत होत्या.

त्यावेळेस महिलांना युद्धभूमीवर पाठवत नव्हते कारण त्यावेळेस अशी धारणा होती की, महिला युद्धभूमीवर टिकतील का? तेथील बिकट परिस्थितीचा सामना महिला करतील का? पण या महिला पायलट्सच्या बॅचला काहीतरी करून दाखवायचे होते त्यांना फक्त एक संधी हवी होती.

ती संधी मिळाली १९९९ च्या कारगिल युध्दाच्या दरम्यान. त्यावेळी जखमी सैनिकांना औषधे आणि खाण्याचे समान पोहोचवायचे होते. त्यावेळी पहिल्यांदा गुंजन आणि त्यांची साथीदार श्री विद्या यांना युद्धभूमीवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा गुंजन यांचे वय फक्त २५ वर्षे होते. गुंजन यांना स्वतःवर विश्वास होता.

गुंजन आणि श्री विद्या यांनी आपल्या चिता हेलिकॉप्टरमधून जखमी सैनिकांपर्यंत औषधे आणि खाण्याचे समान पोहोचवले. त्यांनी द्रास आणि बटालिक या घाटांमध्ये अडकलेल्या जखमी सैनिकांना हेलिकॉप्टरमधून परत आणले आणि औषधे पुरवली. त्यांना अजून एक काम देण्यात आले होते ते म्हणजे पाकिस्तानी सैन्य कुठे कुठे पसरले आहे याचा आढावा घेणे.

यासाठी त्यांना बॉर्डरच्या जवळ जाऊन पाहावे लागत होते. हे काम खूप धोकादायक होते. खूपवेळा त्यांनी १३ फूट उंचीवरून आपल्या हेलिकॉप्टरला खाली हेलिपॅडवर उतरवले होते. नवीन पायलटसाठी ही खूप अवघड गोष्ट होती. एकदा गुंजन यांनी हेलिकॉप्टर चालू केले अचानक पाकिस्तान सैनिकांनी त्यांच्यावर मिसाईलने मारा केला पण त्या खूप थोडक्यात बचावल्या.

युद्धाच्या काळात गुंजन यांनी सैनिकांची खूप मदत केली. गुंजन नेहमी आपल्यासोबत एक रायफल आणि एक पिस्तुल ठेवत असत. कारण जेव्हा कधी युद्धात जर लढायची वेळ आली तर त्या नेहमी तयारीत असायच्या. कारगिल युद्धात केलेल्या कामामुळे गुंजन याना शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. गुंजन या पहिल्या महिला ऑफीसर होत्या ज्यांना हा सन्मान मिळाला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.