Share

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी, फायदा मिळवण्यासाठी आता करावं लागणार ‘हे’ काम, अन्यथा…

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) संदर्भात नवं अपडेट जाहीर झालं आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare Minister) यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.

तटकरे यांनी सांगितलं की, या योजनेतील प्रत्येक लाभार्थी भगिनींना आता e-KYC करणं बंधनकारक आहे. या सुविधेसाठी सरकारने अधिकृत संकेतस्थळ https://ladakibahin.maharashtra.gov.in वर e-KYCची सोय उपलब्ध करून दिली आहे.

दोन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक

मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलं की, पुढील दोन महिन्यांच्या आत सर्व पात्र महिलांनी आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया अगदी सोपी व सुलभ असून, योजनेंतर्गत पारदर्शकता राखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना नियमित मदत पोहोचवण्यासाठी महत्त्वाची आहे.

त्याचबरोबर ही प्रक्रिया भविष्यातील शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेलाच सर्वोच्च प्राधान्य आहे,” असंही तटकरे यांनी अधोरेखित केलं.

e-KYC न केल्यास काय होणार?

शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार, दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत e-KYC करणं बंधनकारक असेल. ज्यांनी ही प्रक्रिया केली नाही, त्यांच्यावर पुढील काळात होणाऱ्या कारवाईस ते स्वतः जबाबदार राहतील.

योजनेतील पात्र महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकरण ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील सर्व भगिनींनी तातडीने e-KYC करून घेणं अत्यावश्यक आहे, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now