Share

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आले का?

Ladki Bahin Yojana:  गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) सुरु राहणार की बंद होणार यावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगत होती. पण आता राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे. या योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.

महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांची माहिती

महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी ‘एक्स’वर माहिती देताना सांगितले की, “माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींनी दाखवलेल्या विश्वासामुळे ही योजना केवळ आर्थिक मदत नाही तर सक्षमीकरणाची मोठी क्रांती ठरत आहे.”

निधी वितरणासाठी शासन निर्णय

या योजनेचा लाभ अखंडित सुरू राहावा यासाठी सामाजिक न्याय विभागाने 9 सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढून 344.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

लाडक्या बहिणींसाठी सातत्याने आर्थिक मदत

महायुती सरकारने (Mahayuti Government) जुलै 2024 पासून सुरू केलेली ही योजना आजवर 13 महिन्यांपासून अखंडपणे सुरू आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. तर पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) आणि नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari MahaSamman Nidhi) लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपयांची मदत मिळते.

आजवरच्या 13 हप्त्यांनंतर आता 14 वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा निधी महिलांच्या खात्यात पोहोचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हजारो महिलांची प्रतीक्षा संपली आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now