बाप्पाच्या प्रसादात बनवलेल्या लाडूंचे शरीराला होतात आश्चर्यकारक फायदे; वाचून व्हाल हैराण

सध्या देशभरात गणेशोत्सव जोरात साजरा केला जात आहे. काहींनी घरात दीड दिवस, कोणी तीन दिवस, कोणी पाच दिवस तर काहींनी दहा दिवसांसाठी गणपतीची स्थापना केली. यावेळी बाप्पाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात.

काही लोक लाडू खाण्यापासून दूर पळतात. त्यांना वाटते की लाडू खाल्ल्याने वजन वाढेल किंवा डायबेटीसचा धोका निर्माण होऊ शकतो. अशाप्रकारे अनेक लोकांना वेगवेगळ्या शंका सतावत असतात.

काही लोक आरोग्याच्या कारणांमुळे लाडू किंवा मोदक खाणे टाळत असले तरी आरोग्य तज्ञ आणि आहारतज्ज्ञांनी लाडूचा प्रसाद खाण्याची शिफारस केली आहे. प्रख्यात आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी लाडू खाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच डॉ.सुचिता भानुशाली यांनीही लाडू खाण्याबाबत सकारात्मक पोस्ट केली आहे.

लाडू प्रसाद नाकारू नका- डॉ सुचिता भानुशाली यांनी लाडू बनवतानाची एक पोस्ट शेअर केली. गणेशोत्सवात मिठाई, लाडू हे माझे आवडते खाद्य आहे. म्हणूनच मी नाश्त्यामध्ये लाडू देखील खाते, अस त्यांनी सांगितल आहे. या पोस्टमधून हे स्पष्ट आहे की आहारात लाडूंचा समावेश करणे हानिकारक नाही, म्हणून प्रसाद म्हणून दिलेले लाडू नाकारू नका.

प्रसाद म्हणून खा- डॉ. भानुशाली सांगतात की तुम्ही लाडू खाण्यापासून दूर राहिलात तरी त्याचा तुमच्या शरीराला फायदा होणार नाही. याचा अर्थ असा की एखादा लाडू खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे प्रसादासारखाच लाडू खाणे वाईट गोष्ट नाही.

हाडे मजबूत आहेत- इतर जेवणांबरोबर मिठाईचा आस्वाद घेतल्यास पौष्टिक मूल्य वाढते. लाडू खाल्ल्याने हाडांच्या पेशी मजबूत होतात आणि त्यांना आवश्यक पोषक मिळतात. याचे कारण असे की लाडूमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, जीवनसत्त्वे अ, डी, ई आणि के आणि प्रथिने भरपूर असतात.

लाडू खाण्याचे फायदे- लाडूमधील पोषक घटक डोक्यापासून ते पायापर्यंत रोगप्रतिकारक शक्तीप्रमाणे शरीराच्या कार्यासाठी आवश्यक असतात. हा एक प्रकारचे उर्जा देणारे फूड आहे. म्हणून जेव्हा शरीराचे तापमान कमी होते तेव्हा ते शरीरात उष्णता निर्माण करते. लाडू खाल्ल्याने शरीरातील सर्व वेदना कमी होतात. परंतु, नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने लाडू बनवता आणि कमी सेवन करता तेव्हाच ते शरीरासाठी उपयुक्त असते.

महत्वाच्या बातम्या-

१ रुपयाचे जुने नाणं तुमच्याकडे असेल, तर तुम्ही लखपती झालाच म्हणून समजा, ते कसे, जाणून घ्या..
भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; आता खाजगी कंपन्यांना खरेदी करता येणार रेल्वे
“जेव्हा माझं गाणं प्रदर्शीत होतं, तेव्हा लोकं मला वेगळ्या चश्म्यातून पाहतात”; अमृता फडणवीसांनी व्यक्त केली खंत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.