कलेक्टरसाहेब डिसेंबरमध्येच लागले होते तयारीला; आता ना ऑक्सिजनची कमी ना बेडची

नंदुरबार |  देशातील अनेक राज्यात मोठ्या प्रमाणावर लस,ऑक्सिजन, बेड यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. लस,ऑक्सिजन, औषध, बेड यांच्या तुटवड्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

कोरोनाच्या परिस्थीतीमुळे राज्यात गंभीर वातावरण निर्माण झालं आहे. उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र राज्यातील असा एक जिल्हा आहे. जिथं जिल्हाधिकाऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे जिल्ह्यात कुठं ऑक्सिजनची कमी दिसत नाही. तर कुठं बेडची कमी दिसत नाही. रुग्णांना उपचारही वेळेवर मिळत आहे.

राज्यातील नंदुरबार या जिल्ह्याची आदिवासी लोकांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. डोंगराळ आणि  दुर्गम अशा जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या प्रामाणिक कार्याने आणि योग्य पध्दतीच्या नियोजनाने त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती बदलून दाखवली आहे.

एकीकडे ऑक्सिजन अभावी संपुर्ण राज्यात रुग्णांचे हाल होताना दिसत आहे. मात्र राजेंद्र भारूड यांनी हतबल न होता  परिस्थितीवर मात केली आहे. भारूड यांनी केलेल्या कामाचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल, कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कौतूक केलं आहे.

सुरूवातीला नंदुरबारमध्ये कोरोना रुग्णांसाठी अवघे २० बेड होते. मात्र सध्या जिल्ह्यातील रुग्णालयात बेडची संख्या १ हजार २८९ आहे. तर ग्रामीण भागातील रुग्णालयात ५ हजार ६२० बेड आहेत. तर कोविड केअर सेंटरसाठी १ हजार ११७ बेड्स आहेत.

तसेच ७ हजारापेक्षा जास्त आयसोलेशन बेड्स आणि १ हजार ३०० आयसीयु बेड्सदेखील उपलब्ध आहेत. हे सर्व झालं आहे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या नियोजनामुळं. ऑक्सिजनसाठी भारूड यांनी तीन हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभे केले आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबवण्यात आली आहे.

लोकांना लस वेळेवर मिळावी यासाठीही भारूड यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. लसीकरण मोहिमेला वेग देत त्यांनी लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पुर्ण केला आहे. लसीकरण मोहिमेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागामार्फत पथकांची स्थापना केली आहे.

भारूड यांनी महाराष्ट्र शासनाकडे कोविड कोचची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय रेल्वे विभागातर्फे नंदुरबार रेल्वे स्थानकात कोरोना रुग्णांसाठी रेल्वेची सोय करून देण्यात आली आहे. यामध्ये २४ तास आरोग्य कर्मचारी रुग्णांची सेवा करत असतात.
महत्वाच्या बातम्या-
“IPL सामन्यांवर केंद्राने बंदी आणून खेळाडूंनी खजिना जनतेसाठी खुला करावा”
लग्नात घुसून वऱ्हाडींवर कठोर कारवाई करणाऱ्या ‘त्या’ कलेक्टरचे भाजप सरकारकडून निलंबन
ज्या तुकाराम मुंढेंचा भर सभागृहात अपमान केला त्यांनाच पुन्हा बोलवण्याची मागणी
नरेंद्र मोदींना नेतृत्व कसे करावे कळत नाही, मोदीजी राजीनामा द्या; कंगणाची धक्कादायक मागणी

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.