एका रात्रीत ‘मजूर’ झाला ‘लखपती’, ४० रुपयांमध्ये खरेदी केलेल्या तिकीटावर लागली ८० लाखांची लॉटरी

केरळ | लोक रात्रीत मालामाल होण्याची स्वप्न बघतात. आणि त्यासाठी लॉटरी खरेदी करण्याची अनेक लोकांना सवय लागलेली आहे. या लॉटरी खरेदीच्या प्रकारामुळे ठिकठिकाणी रातोरात झाला करोडपती, नशीब फळफळले, कोटींचा झाला धनी अशा बातम्या समोर येतात. परंतु खरच नशिबानं साथ दिली तर एखादा मजूर सुद्धा ४० रुपयांमध्ये ८० लाख रुपयांचा मालक होऊ शकतो.

केरळच्या तिरूवनंतपुरममध्ये बांधकाम साइटवर काम करणाऱ्या मजूर प्रतिभा मण्डल या व्यक्तीने तब्बल ८० लाख रुपयांची लॉटरी जिंकली आहे. त्याने केरळ सरकारकडून काढली जाणारी साप्ताहिक कारूण्य प्लस लॉटरीमध्ये ८० लाख रुपये जिकंले आहेत. विशेष बाब म्हणजे या मजूराचे बँक अकाउंटही नव्हते.

अचानक लॉटरी लागली आणि आपल्याला इतके पैसे मिळणार यामुळे प्रतिभा हा मजूर काही क्षणासाठी आनंदी झाला. परंतु त्याला भीती देखील वाटली. त्याच्या समोर अनेक प्रश्न उभे राहिले. या सर्व परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी त्याने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

प्रतिभा हा मजूर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्याने सुरक्षेची मागणी केली. याशिवाय पैशाची व्यवस्था करण्यासाठी पोलिसांसोबत बोलणे केले. पोलिसांनी कॅनरा बँक कर्मचाऱ्यांना पोलिस स्टेशमध्ये बोलवून या मजूराचे अकाउंट उघडून दिले. दरम्यान, लॉटरीत जिंकलेले पैसे लॉकरमध्ये ठेवले गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
खाता का नेता, असे म्हणत वडापाव विकणारे हे चाचा कोण आहे माहितीये का?
…तर मुंबईतून बाहेर पडू देणार नाही, भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी
“मी सुशांतला अनेकदा मरताना पाहिलं आहे”, सुशांतच्या आठवणीत अभिनेता झाला भावुक
कपूर घराण्यात सनई चौघडे! श्रद्धा लवकरच अडकणार लग्नबेडीत, मुलाच्या घरून आला होकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.