खुशखबर! कुसुम योजनेचा २० लाख शेतकऱ्यांना लाभ, सौर पंप मिळवण्यासाठी असा करा अर्ज

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीजबिलाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. अशात केंद्र सरकारने शेतकरी ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान अर्थात कुसुम या योजनेची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात जवळपास १ लाख सौर पंप स्थापित करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

याअंतर्गत ३ एचपी, ५ एचपी आणि ७.५ एचपी क्षमतेच्या सौर पंप स्थापित करण्यात येणार आहेत. कुसुम योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पॅनल बसवून तेथून निर्माण होणारी वीज सिंचनासाठी वापरता येणार आहे. यावर्षिच्या अर्थसंकल्पात २० लाख सौरपंपाना अनुदान देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी १.४० लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा?
राज्यात पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या https://mahadiscom.in/solar-pmkusum/index_mr.html  या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. यासाठी शेतकऱ्यांकडे आधारकार्ड, जमिनीचा उतारा, पाण्याचा स्त्रोत, बँक खाते, पासबूक झेरॉक्स ही कागदपत्र असणे गरजेचे आहे.

तसेच, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी १० टक्के खर्च करावा लागणार आहे. तर एससी आणि एसटीच्या शेतकऱ्यांना ५ टक्के खर्च करणे अपेक्षित आहे. जलसंपदा विभाग किंवा जलसंधारण विभागाचं पाणी उपलब्धतेबद्दलचं प्रमाणत्र गरजेचे असणार आहे.

कुसुम योजनेची वैशिष्ट्ये-
शेतकऱ्यांना सौर उर्जा उपकरण बसवण्यासाठी १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यातमध्ये सबसिडीची रक्कम जमा करणार आहे. कुसुम योजनेमध्ये बँका शेतकऱ्यांना ३० टक्के रक्कम कर्ज स्वरुपात देणार आहेत.

सौर उर्जा पॅनल पडीक जमिनीवर लावता येईल. पडीक जमिनीवर सौर पॅनल बसवले जाणार असल्याने नपीक जमीनदेखील वापरात आणणे या योजनेमुळे शक्य होणार आहे. शेतकरी या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या पिकांना पाणी देऊ शेकतील. याशिवाय उत्पादित होणारी वीज घरगुती वापरासाठी काही प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल.

महत्वाच्या बातम्या-
१ एप्रिलपासून नवी योजना सुरू, एकदा भरलेल्या प्रीमियमवर आयुष्यभरासाठी पेन्शन; जाणून घ्या
घरात पडून असलेल्या सोन्यातून दुप्पट कमाई, जाणून घ्या सरकारची नवी योजना
१५ वर्ष जुन्या गाड्या आता थेट जाणार भंगारात, जाणून घ्या नवीन नियम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.