रत्नागिरी, १९ मार्च : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जंगी सभा झाली. या बैठकीला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने खेड येथील गोळीबार मैदानावर सभा आयोजित केली आहे. या सभेचा टिझरही जाहीर झाला आहे. मात्र सभेपूर्वीच एकनाथ शिंदे यांना जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सभेला संबोधित करणार आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिल्यानंतर आणि त्यांना ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह वाटप केल्यानंतर शिंदे यांची ही पहिलीच सभा असेल.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. ठाकरे गटाचे आणखी काही आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते करताना दिसत आहेत. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.
दापोलीत ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक आणि दापोली नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष योगेश कदम यांचे कट्टर समर्थक प्रशांत कुसाळकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दापोली नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर हे आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र कुसाळकर आता ठाकरे गटात दाखल झाल्यामुळे शिंदे गटाला साथ दिलेल्या योगेश कदम यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर ठाकरे गटात सामील झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. याआधीही जिल्ह्यात शिंदे गटाला ठाकरे गटाने दणका दिला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांनी पंधरवड्यापूर्वी जाहीर सभेला संबोधित केले होते त्याच ठिकाणी हा मेळावा होणार आहे हे विशेष. आता एकनाथ शिंदेंसह रामदास कदमांची तोफही तेथून धडाडणार आहे. शिंदे गटाचे मोठे नेते सभेला उपस्थीत असणार आहेत.
काही दिवसांपूर्वी माजी आमदार संजय कदम ठाकरे गटात सामील झाले होते. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना जिल्ह्यात आव्हान देण्याची रणनीती ठाकरे गट करत असून या पार्श्वभूमीवर संजय कदम यांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
खेड हा ठाकरेंचे माजी निष्ठावंत रामदास कदम यांचा मतदारसंघ आहे. ज्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोकण हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते उदय सामंत सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत.
खेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे करत आहेत. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर खेडमधील आपल्या पहिल्या जाहीर सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी 5 मार्च रोजी भारतीय जनता पक्ष (भाजप) हा देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष आहे असे म्हटले होते.