“फडणवीस रोज पहाटे उठून राज्यपालांना फोन करून विचारतात मी पुन्हा येऊ का?”

मुंबई : राज्यात मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सचिन वाझेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंगांची उचलबांगडी करण्य़ात आली होती. तर दुसरीकडे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि बदल्यांमधील भ्रष्टाचाराप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मौन का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

तसेच या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली. तसेच १०० वेगवेगळ्या मुद्यांसंदर्भात आपण तक्रारी केल्याचेही भाजपाने सांगितले आहे.

यावरूनच कॉमेडीयन कुणाल कामराने फडणवीसांनावर शाब्दिक निशाणा साधला आहे. ‘फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होऊन राज्यपालांना फोन करतात,’ असा टोला कामराने फडणवीस यांना लगावला आहे. याबाबत कुणाल कामराने एक ट्विट केले आहे.

ट्विट कामराने म्हंटले आहे की, ‘जर तुम्हाला आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये अपयश येत आहे असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की देवेंद्र फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होतात आणि राज्यपालांना फोन करुन विचारतात, मी पुन्हा येऊ का?”.

देवेंद्र फडणवीस पुन्हा कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत…
विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपची ‘मी पुन्हा येईन’ ही टॅग लाईन खूपच चर्चेत आली होती. मात्र पुढे सत्तापालट होऊन राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.

मात्र असे असले तर विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस उत्तम कामगिरी बजावत आहेत व भाजपला त्यांच्या नेतृत्वात पुन्हा सत्तेत येणार असल्याचा पूर्ण विश्वास आहे. याचाच धागा पकडत प्रसिद्ध स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरा याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

ट्वीट करत त्याने म्हंटले आहे की, ‘मृत्यूनंतर काय घडते याबद्दल मला माहिती नाही, काळाची संकल्पना पुढे कशी विकसित होईल याची खात्री नाही, उद्या खरोखर उजाडेल की नाही याची मला खात्री नाही; पण देवेंद्र फडणवीस पुन्हा कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे.’

महत्त्वाच्या बातम्या 

“सुशिक्षित लोकं जास्त असल्याने भाजपला मते मिळत नाहीत”; भाजप नेत्याची कबुली

“…तर त्यांनी साडी नेसण्याऐवजी बर्मुडा घालावा”, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

“केरळमधील लोक सुशिक्षित आहेत, म्हणून भाजपला मतदान करत नाहीत” भाजप आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.