“देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”

मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपची ‘मी पुन्हा येईन’ ही टॅग लाईन खूपच चर्चेत आली होती. मात्र पुढे सत्तापालट होऊन राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.

मात्र असे असले तर विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस उत्तम कामगिरी बजावत आहेत व भाजपला त्यांच्या नेतृत्वात पुन्हा सत्तेत येणार असल्याचा पूर्ण विश्वास आहे. याचाच धागा पकडत प्रसिद्ध स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरा याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

ट्वीट करत त्याने म्हंटले आहे की, ‘मृत्यूनंतर काय घडते याबद्दल मला माहिती नाही, काळाची संकल्पना पुढे कशी विकसित होईल याची खात्री नाही, उद्या खरोखर उजाडेल की नाही याची मला खात्री नाही; पण देवेंद्र फडणवीस पुन्हा कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे.’

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, त्यानंतर परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांमुळे भाजपने ठाकरे सरकारला कोडींत पकडले आहे. तर कुणाल कामरांसारखे अनेक काॅमेडियन राजकीय मुद्यांवरून भाष्य करताना दिसत आहेत.

सध्या राज्यात राजकीय वातावरण फारच तणावपूर्ण आहे. एकीकडे विविध घटनांवरून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी नेत्यांना लक्ष करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

या मायलेकी आहेत जगातल्या पहिल्या रोझ वाईन क्वीन, कारनामा वाचून अभिमान वाटेल

एकेकाळी पाणीपुरी विकायचा हा क्रिकेटर, आयपीएलमध्ये लागली करोडो रूपयांची बोली

नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; ‘सगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.