कुंभमेळ्यात पॉझिटिव्ह आलेले १९ भाविक रुग्णालयातून फरार, घटनेने सर्वत्रच खळबळ

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. असे असतानाच लाखो भाविकांच्या उपस्थितीत हरिद्वारच्या कुंभमेळ्यात आता कोरोनाचा शिरकाव झाला होता.

त्यामुळे कुंभमेळा हा सुपर स्पेडर ठरला होता. असे असताना एक खळबळजनक घटना घडली आहे. कुंभमेळ्यात कोरोना पॉझिटिव्ह आलेले १९ जण रुग्णालयातून फरार झाले आहे. ही घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

या घटनेमुळे प्रशासन आणि आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना रुग्ण असे पळून गेल्याने परिसरात भिती निर्माण झाली आहे, तर घटनेमुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

राजस्थानमधील १९ भाविक हे हरिद्वारमध्ये असलेल्या कुंभमेळ्यात आले होते. आता त्यातले काही जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांना उपचारासाठी टिहरी जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याच दरम्यान रुग्णालयातून १९ भाविक पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्या १,५३,२१,०८९ इतकी झाली आहे, तर मृतांची संख्या १,८०,५३० वर पोहचली आहे.

अशात कुंभमेळा हा सुपर स्प्रेडर ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कुंभमेळ्याच्या शाहीस्नानात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे हरिद्वारमध्ये दोनच दिवसात १ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह ठरले होते.

महत्वाच्या बातम्या-

सलमान खानचे नाव घेत राखी सावंत रोडवर ढसाढसा रडली, वाचा सविस्तर
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील अभिनेता मुलाच्या उपचारासाठी मागतोय मदत
आग ओकणाऱ्या उन्हात गरोदर DSP ड्युटीवर, तरी लोकांचे नियम मोडण्याचे काम सुरुच

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.