राष्ट्रीय पुरस्कार मिळत नसल्याने गायक कुमार सानुंनी व्यक्त केली खंत, म्हणाले…

भारतातील सुप्रसिध्द गायक कुमार सानु यांनी गेल्या ३० ते ३५ वर्षामध्ये १४००० पेक्षा अधिक सुपरहिट गाणे गायली असूनही राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याने आपली खंत बोलून दाखवली आहे. तसेच यामध्ये काहीतरी झोल होत असल्याचा आरोप कुमार सानु यांनी केला आहे.

एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की, मी आतापर्यंत खुप गाणी बॉलिवूडमध्ये गायली आहेत. ती सर्व गाणी सुपरहिट ठरली आहेत. १९९० ते १९९६ च्या काळात आमच्या गाण्याइतकी दुसरी कोणतीच गाणी हिट होत नव्हती. इतके चांगले काम करूनही प्रत्येक वर्षी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याची आशा होती पण मिळाला नाही. ज्यावेळेस हा पुरस्कार मिळण्याच्या मी लायक होतो त्यावेळेस मला पुरस्कार देण्यात आला नाही तर आता काय मिळणार असं त्यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, माझ्या चाहत्यांच्या पुढे या पुरस्कारांचं काहीच मोल नाही. माझ्यावर त्यांचे जे प्रेम आहे हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे. पण जेव्हा जेव्हा राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा होते तेव्हा मात्र मला वाईट वाटते. माझे योगदान या क्षेत्रात मोठे असूनही नवीन कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळतो पण मला मिळत नाही कदाचित मी पुरस्करासाठी लायक नाही. मला असं वाटतंय की या पुरस्कारांमध्ये मोठं राजकारण होत असणारं.

सर्वात महत्वाचे म्हणजे पद्मश्री पुरस्कार मला कधी मिळेल अशी कुठलीच आशा नव्हती. आयुष्यात कधी इतका मोठा पुरस्कार मिळेल असा विचारही कधी केला नव्हता. असं गायक कुमार सानू यांनी म्हटलं आहे.
म्हत्त्वाच्या बातम्या-
आरारारा राडा! १०० कोटी घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री
चहा विकून घर चालवते योगी आदित्यनाथ यांची बहीण, पुढची कहाणी वाचून डोळ्यात पाणी येईल
संभाजी ब्रिगेड सचिनविरोधात आक्रमक; भारतरत्न काढून घेण्याची केली मागणी
‘मुर्खांनो जरा तरी विचार करा’ म्हणत अमेरिकन अभिनेत्रीचं बॉलिवूडकरांवर टीकास्त्र

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.