Share

‘…म्हणून सुरेश रैना IPL लिलावात अनसोल्ड राहिला’, कुमार संगकारानं सांगितली इनसाईड स्टोरी

Raina-Sangkara.

२६ मार्चपासून आयपीएलचा(IPL) क्रिकेट स्पर्धेला सुरवात होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. या हंगामात आयपीएलमध्ये दोन नवीन संघ देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिकांना थरार पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलचा मेगा लिलाव सोहळा पार पडला होता.(kumar sangakara talk about why suresh raina ansold in ipl auction)

या सोहळ्यात अनेक युवा खेळाडूंवर संघानी कोट्यवधींची बोली लगावली होती. पण या मेगा लिलावात अनेक दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले होते. मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाला देखील या लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतलं नाही. यामुळे सुरेश रैनाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आयपीएलच्या मेगा लिलावात सुरेश रैनावर कोणत्याही संघाने का बोली लगावली नाही. सुरेश रैना या लिलावात अनसोल्ड का राहिला, याबाबत श्रीलंकेचा माजी खेळाडू आणि राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांनी मोठा खुलासा केला आहे. आयपीएल २०२२ च्या नवीन हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघाने उत्कृष्ट खेळाडू निवडले आहेत.

यावेळी राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक कुमार संगकारा म्हणाला की, “आता संघ भूतकाळातील कामगिरीऐवजी भविष्याचा विचार करून खेळाडूंची निवड करत आहेत. याकडे पाहण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. जसजसा काळ जातो, तसतसे खेळाडू बदलत राहतात. तसेच युवा खेळाडूही आपली छाप सोडत आहेत.

कुमार संगकारा पुढे म्हणाला की, “सुरेश रैनाची आयपीएलमध्ये मोठी प्रतिष्ठा आहे. तो उत्कृष्ट खेळाडू राहिला आहे. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात त्याने चांगली कामगिरी केली आहे. पण भविष्याचा विचार केला तर कदाचित रैना आयपीएलच्या पुढील हंगामासाठी फिट नसेल. ह्या सर्व बारीसारीक गोष्टींचं निरीक्षण सर्व क्रिकेट विश्लेषक, प्रशिक्षक आणि मालक करत असतात. ”

यावेळी कुमार संगकाराने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचे देखील कौतुक केले. आयपीएल स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांमध्ये होणार आहे. आयपीएलच्या या हंगामातील सर्व उपांत्यफेरी पर्यंतचे सामने महाराष्ट्रात खेळवले जाणार आहेत. मुंबई आणि पुण्यामध्ये हे सामने होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
सैफ अली खानच्या वडिलांशी होणार होते ‘या’ अभिनेत्रीचे लग्न; एका दु:खापासून आजही सावरू शकली नाही स्वत:ला
२०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; ‘आप’बाबत केले ‘हे’ मोठे वक्तव्य
टाटासह ‘या’ दोन शेअर्सने झुनझुनवालांना केले मालामाल, एका दिवसात कमावले तब्बल ८६१ कोटी

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now