Share

8 जागांवर भाजप, 7 जागांवर शिवसेना विजयी, नगराध्यक्षपद मात्र १ जागा जिंकलेल्या काँग्रेसकडे; पहा कुठे झाली ही कमाल

bjp-shivsena-congress

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. कुडाळ नगरपंचातीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.(kudal nagradhyksh given to congress party candidate)

कुडाळ नगरपंचातीच्या नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या अफ्रिन करोल यांची निवड झाली आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हातून कुडाळ नगरपंचायत निसटली आहे. कुडाळ नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली आहे. नगराध्यक्ष पदाच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अफ्रिन करोल यांना नऊ तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना आठ मते मिळाली आहेत.

गेली पाच वर्षे कुडाळ नगरपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता होती. पण या निवडणुकीत भाजपने आठ जागांवर विजय मिळवला होता. तर शिवसेना पक्षाला सात आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. कुडाळ नगरपंचायतीवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी नऊ जागांची आवश्यकता होती. तयामुळे या निवडणुकीत काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत होती.

कुडाळ नगरपंचायतीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सत्ता येणार असे वाटत होते. पण आमदार वैभव नाईक यांनी खेळी करत २ नगरसेवक असणाऱ्या काँग्रेसला नगराध्यक्ष पद देऊ केले आणि कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित केली. या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी कुडाळमध्ये पुन्हा शिवसेना, भाजप आणि काँग्रेस समर्थक आमने-सामने आले.

यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. अखेर ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार वैभव नाईक यांचे कार्यकर्ते आणि भाजप पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. गाडी नगरपंचायतीच्या आवारात आणण्याच्या विषयावरून वाद झाला असल्याची माहिती मिळत आहे.

सिंधुदुर्ग मधील कुडाळ नगरपंचातीच्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर देखील शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयासमोर आमदार वैभव नाईक यांची विजयी मिरवणूक काढली होती. यावेळी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.

महत्वाच्या बातम्या :-
राज ठाकरेंना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणत मनसेची बॅनरबाजी, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा
खाण्या-पिण्यातील ‘या’ पाच चुकांमुळे पुरुषांचे गळतात केस, आजच आपल्या आहारात करा बदल
मी तर तुझ्या परिसरात आहे! मुस्लिम व्यक्तीच्या स्वप्नात आले श्रीकृष्ण भगवान, ४० लाख खर्च करून उभारले मंदिर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now