KOO तुमच्या घरासारखे आहे, बाकी सगळे भाड्याचे; कू ने केले कंगणा राणावतचे स्वागत

मुंबई | बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री कंगणा राणावत नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढावून घेत असते. गेल्या काही दिवसांपासून बेजबाबदारपणे ट्विट करण्याचा कंगणाने सपाटाच लावला होता.

पश्चिम बंगालच्या निवडणूकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिथे हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर कंगणाने बंगालमधील जनतेबद्दल आणि तृणमुल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह विधानं ट्विट केली होती.

कंगणाच्या  ट्विटला अनेकांनी रिपोर्ट केलं होतं. त्यानंतर ट्विटरकडून कंगणा राणावतचे ट्विटर हॅंडलवर सस्पेंडची कारवाई करण्यात आली होती. कंगणाच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई केल्यानंतर बेधडकपणे बोलणारी कंगणा आता आपले मत कोणत्या माध्यमातून मांडेल. असा प्रश्न अनेकांना पडला होता.

कंगणा राणावतने भारतीय KOO अॅपवर फेब्रूवारी महिन्यात अकाऊंट उघडल होतं.  कंगणा राणावतने कूवर पोस्ट केली होती. त्यात तिने म्हटलं होतं की, भाड्याचे घर शेवटी भाड्याचे असते आणि आपले घर आपलेच असते.

कंगणाच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई केल्यानंतर कू अॅपचे सीईओ व सहसंस्थापक अप्रमेय राधाकृष्णनने कंगणाच्या या पोस्टचा फोटो  फोटो शेअर केला आहे.  राधाकृष्णनन म्हणाले की हे अगदी बरोबर आहे. कू तुमच्या घरासारखे आहे. बाकी सगळे भाड्याचे आहे. असं म्हणत कंगणा राणावतचं कू वर स्वागत केलं आहे.

कू हे भारतीय बनावटीचं ट्विटर सारखंच अॅप आहे. देशातील अनेक मोठ्या नेत्यांचं, सेलिब्रिटींच कू वर अकाऊंट आहे. १४ नोव्हेंबर २०१९ ला या अॅपला लॉन्च करण्यात आले होते. कू अॅप एकूण १८ भाषांमध्ये वापरू शकतो. ट्विटरला टक्कर देण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर हे अॅप वापरले जाते.
महत्वाच्या बातम्या-
अमिताभ बच्चनपासून ते अंबानीपर्यंत मोठमोठे सेलीब्रीटी पितात पुण्यातील या डेअरीचे दूध
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजेंनी सुचवला ‘हा’ नामी उपाय
जगातील ५ असे घटस्फोट जिथं पत्नी वेगळी झाल्यानंतर बनली अब्जाधिश आणि नवरा झाला थोडा गरीब

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.