Share

PHOTO: अखेर क्षमानं स्वत:शीच केलं लग्न, पंडिताने दिला नकार मग ‘अशा’ पार पाडल्या सगळ्या विधी

गुजरातमधील तरुणी क्षमा बिंदूने स्वतःशीच विवाह केला आहे. क्षमा बिंदूने ११ जून रोजी स्वतःशी लग्न करण्याची घोषणा केली होती. यानंतर भाजपने क्षमा बिंदूच्या(Shama Bindu) स्वतःशीच लग्न करण्याच्या निर्णयावर तीव्र विरोध दर्शविला होता. त्यामुळे वाद टाळण्यासाठी क्षमा बिंदूने नियोजित तारखेपूर्वीच स्वतःशी लग्न केले आहे. (shama bindu marriage photo viral )

एका खास विवाह सोहळ्यात क्षमा बिंदूने स्वतःशीच लग्नगाठ बांधली आहे. वडोदरामधील गोत्री या ठिकाणी हा खास विवाह सोहळा पार पडला आहे. सर्व रितीरिवाजांनुसार क्षमाने लग्न केले आहे. पण या लग्न सोहळ्यात पंडित हजर नव्हते. या खास लग्न सोहळ्यासाठी क्षमाच्या काही खास मित्रांनी हजेरी लावली होती.

या लग्नासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. क्षमा बिंदूने या लग्नासाठी खास लेहंग्यापासून पार्लर आणि ज्वेलरीपर्यंत सर्व काही बुक केले होते. भारतामध्ये असा पहिलाच विवाह सोहळा पार पडला आहे. क्षमाने स्वतःशीच लग्न करण्याची घोषणा केल्यानंतर अनेकांनी तिच्या निर्णयाचा विरोध केला होता. शेजाऱ्यांनी देखील क्षमाला विरोध दर्शवला होता.

लग्न सोहळ्यानंतर क्षमा बिंदूने प्रतिक्रिया दिली आहे. “मी ठरलेल्या तारखेपूर्वी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण मला भीती वाटत होती की ११ जून रोजी लोक या लग्न सोहळ्यात येऊन वाद निर्माण करतील. त्यामुळे मी बुधवारी विवाह करण्याचा निर्णय घेतला”, असे क्षमा बिंदूने सांगितले. क्षमाने यापूर्वी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

पण भाजपाच्या वडोदरा शाखेच्या उपाध्यक्षा सुनिता शुक्ला यांनी या लग्नाला तीव्र विरोध दर्शविला होता. तिला मंदिरात लग्न करू देणार नाही, अशी भूमिका सुनिता शुक्ला यांनी घेतली होती. ‘मला तिच्या लग्न करण्याच्या स्थळाविषयी अडचण आहे. कोणत्याही मंदिरामध्ये तिला स्वतःशी लग्न करता येणार नाही. अशी लग्न हिंदुत्वाच्या विरोधातली आहेत. यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल”, असे सुनिता शुक्ला यांनी सांगितले होते.

तसेच क्षमा बिंदू ही मुलगी मानसिक रुग्ण असल्याचे देखील सुनिता शुक्ला यांनी सांगितले होते. भाजप नेत्याच्या विरोधानंतर क्षमा बिंदूने घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पंडितांनी क्षमा बिंदूच्या लग्नाचे विधी करण्यासही नकार दिला. यावर क्षमा बिंदूने टेपवर मंत्र वाजवून लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या :-
फडणवीसांनी दाखवलेला विश्वास मरेपर्यंत टिकवेन म्हणत सदाभाऊंनी सांगीतली विजयाची स्ट्रॅटेजी
“कुणीही नवखे आले की पक्ष त्यांना उमेदवारी देतो”, पंकजा मुंडेंना डावलल्यानंतर खडसेंची भाजपवर टीका
२४ किमी शाळेत सायकलने जायचा, कधी पाॅकेटमनी दिला नाही; आई-वडीलांनी सांगीतलं सिद्धूचं बालपण

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now