कोरोनामध्ये नोकरी गेली पण त्याने जिद्द सोडली नाही; काजूचा बिझनेस करून कमवले लाखो

 

कोरोनाकाळात अनेक लोकांची नोकरी गेली. गोष्ट आहे तामिळनाडू मधील कन्नूर येथील. येथे राहणाऱ्या ब्रिजित कृष्णा यांनी काजूचा बिजनेस सुरू केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून कृष्णा इरिट्टीच्या जवळ असलेल्या एका गावात काजूची शेती केली. त्यातून त्यांनी एक लाख रुपये कमवले.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार ४२ वर्षांचे असलेले कृष्णा यांनी कोरोना महामारीच्या काळात आपली नोकरी गमावली. त्याच दरम्यान त्यांनी तीन क्विंटल काजूबरोबर प्रयोग केला. त्याच प्रयोगातून आज त्यांनी लाखो कमवले. त्यांच्या या प्रयोगाला स्थानिक लोकांनी खूप पसंत केले आहे. सुपरमार्केट पासून ते इंटरनॅशनल मार्केटमधून त्यांना आता ऑर्डर येत आहेत.

कृष्णा यांनी अंकुरित काजू यांचा व्यापार केला आहे. हे काजू पावसाळ्यात येतात. असे पहिल्यांदा झाले आहे की, या काजूचा कमर्शिअल वापर झाला आहे. काजूच्या स्प्राउट्सचा उपयोग साग, सलाद, स्नैक्स आणि मिल्कशेक यासाठी केला जातो.

केरळ कृषी विश्वविद्यालयात असणाऱ्या काजू अनुसंधान स्टेशन यांनी कृष्णा यांना स्प्राउट्स चे उत्पादन करण्यासाठी तंत्रज्ञान दिले आहे. हे सगळे यासाठी केले गेले की, काजूचे उत्पादन वाढवता यावे. त्यानंतर त्यांनी काजूची रोपेसुद्धा विकायला सुरुवात केली आहे.

कृष्णा म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये काजू कोणच खरेदी करत नव्हते. जमिनीवर पडलेले नट्स अंकुरित झाल्यानंतर बेकार जात होते. त्याच्यापासून मी घरी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात आधी मी माझ्या मित्रांना सांगितले त्यांना हे खूपच आवडले. मग नंतर मी हे काजू दुकानात आणि लोकांना विकायला सुरुवात केली.

जालाजा एस मेनन ह्या काजू रिसर्च स्टेशनमध्ये प्रोफेसर आहेत. त्यांनी सांगितले की, अंकुरित काजुमध्ये मोठ्या प्रमाणवर आयरन असते. तसेच त्याच्यात कॅल्शिअम आणि फायबर यांची मात्रा खूप असते. कृष्णा म्हणाले की, या पारंपरिक टेक्निकच्या आधारे त्यांनी आतापर्यंत खूप पैसे कमवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

राऊतांनी काढला विरोधकांना चिमटा; ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या, पण…

नशेत मी शाहरुखला प्रचंड त्रास दिला; स्वरा भास्करने सांगितला किस्सा 

पुलवामा हल्ल्याची कबुली पाकिस्तानने दिल्यानंतर मोदींनी साधला काॅंग्रेसवर निशाना; म्हणाले..

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.