ज्यांना पोसलं, लहानच मोठ केलं तेच डोक्यावर बसून…; कृष्णा अभिषेकवर भडकली गोविंदाची बायको…

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्यातील नात्यात आलेला कडवटपणा कमी होण्याचे नाव घेत नाही. अलीकडेच, गोविंदा पत्नी सुनीता आहुजासह ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पाहुणे म्हणून सामील झाले होते पण कृष्णा शोमधून गायब राहिला.

कृष्णा म्हणतो की दोन कुटुंबांमधील तणाव अजूनही चालू आहे. तर सुनीता म्हणाली की तिला कधीही कृष्णाचा चेहरा बघायचा नाही. त्यांच्या नात्यातील कडवटपणा बऱ्याच काळापासून आपल्याला पाहायला मिळत आहे.

govinda opens up on broken relationship with nephew krushna abhishek says  his statement had defamatory comments and was thoughtless kapil show know  details div | भांजे कृष्णा अभिषेक से अनबन पर बोले गोविंदा-

बॉम्बे टाइम्सशी बोलताना गोविंदा आणि सुनीताच्या एपिसोडबद्दल त्याच्या अनुपस्थितीत कृष्णा म्हणाला की, मला वाटते की दोन्हीही पक्षांना एक स्टेज शेअर करायचा नाही. मामा गोविंदासोबत त्याचे तणाव अजूनही चालू आहे.

गोविंदाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही पण त्याची पत्नी मोकळेपणाने बोलली. बॉम्बे टाईम्सला उत्तर देताना सुनीता म्हणाली की ‘गोविंदाने गेल्या वर्षीच सांगितले आहे की तो या विषयावर जाहीरपणे बोलणार नाही. त्याने आपले वचन एका सज्जनाप्रमाणे ठेवले पण कृष्ण पुन्हा बोलला. मला फक्त हे सांगायचे आहे की आम्ही आदराने दूर राहिले पाहिजे. तर दुसर म्हणजे आता हे प्रकरण एका टप्प्यावर आले आहे जिथे मी ते सोडवले पाहिजे.

Govinda Open Up About His Fight With Krishna Abhishek - गोविंदा ने भांजे  कृष्णा अभिषेक के साथ मनमुटाव पर कही बडी बात, छवि खराब करने का लगाया आरोप! |  Patrika News

सुनिता म्हणते की, आम्ही जेव्हा जेव्हा शोमध्ये येतो, तेव्हा ते प्रसिद्धीसाठी माध्यमांमध्ये आमच्याबद्दल विधाने देतात. तसेच अभिषेक कॉमेडीसाठी आपल्या मामाचे नाव वापरतो. तो हिट शो देण्याइतका प्रतिभावान नाही. सलोखा करायला आता जागा नाही. गेल्या तीन वर्षात तेढ आणखी वाढली आहे.

सुनीता पुढे म्हणाली, “मी तीन वर्षांपूर्वी म्हटले होते की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या गोष्टी सोडवता येणार नाहीत. ज्यांना आम्ही पोसलं, लहानच मोठ केलं तेच आज डोक्यावर बसू लागले. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की मी आयुष्यभर त्याचा चेहरा पाहू इच्छित नाही.

वास्तविक, दोन कुटुंबांमधील कटुतेचे कारण कश्मीरा शाहचे एक ट्विट आहे ज्यात तिने पैशांसाठी लोकांच्या नाचण्याचा उल्लेख केला आहे. सुनीता म्हणते की ते तिने गोविंदासाठीच लिहिले होते. यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये बराच दुरावा निर्माण झाला. हे वाद इतके वाढले आहेत की त्यांना एकमेकांचे तोंड बघायलाही आवडत नाही.

महत्वाच्या बातम्या-

तारक मेहता शोच शुटींग थांबलं! दोन कलाकारांची तब्येत बिघडल्याने निर्मात्यांनी घेतला ‘हा’ निर्णय….
एवढे पैसे असून काय उपयोग, वृद्धांला मदत न केल्याने लोक श्रद्धा कपूरवर भडकले; पहा व्हिडिओ…
भारतीय वंशाच्या जसकरणाने ठोकले सहा बॉलात सहा सिक्स अन् रचला इतिहास; व्हिडिओ होतोय व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.