भल्या भल्यांना जमला नाही तो विक्रम फक्त २० धावा करत कृणाल पांड्याने आपल्या नावावर केला

कृणाल पांड्या हा बडोदा क्रिकेट संघाकडून खेळणारा एक भारतीय क्रिकेटपटू आहे. तसेच आयपीयलमध्ये मुंबई इंडियन्स संघात २०१४ पासून खेळत आहे.तो अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. आणि सर्वांना माहितच आहे. कृणालचा भाऊ हार्दिक पांड्या जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघात खेळतो .

हार्दिक पांड्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. पण कृणाल पांड्याच्या नावावरही असा एक विक्रम आहे जो त्याने फक्त २० धावा करून केला आहे. कोणालाही वाटले नव्हते की आसा विक्रम कृणाल पांड्याच्या नावावर होईल ते.

आयपीएलच्या २०२० च्या १३ व्या मोसमातील १७ वा सामना मागच्या आठवड्यात पार पडला. हा आयपीएल सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना पार पडला. प्रत्येक संघ या छोट्या मैदानावर २०० पेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करत होते.

तब्बल सहा सामन्यांपासून प्रत्येक संघाचा हा प्रयत्न चालू होता. पण मागच्या आठवड्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने २०० धावा केल्या. एवढ्या धावा मुंबई इंडियन्स संघाला कृणाल पांड्यांच्या मदतीने करता आल्या. खुद्द मुंबई इंडियन्सच्या संघाला वाटले नव्हते की, ते २०० धावा करू शकतील, पण हे क्रुणाल पांड्या या खेळाडूने शक्य करून दाखवलं आहे.

कृणाल पांड्या खेळायला आला तेव्हा मुंबई इंडियन्स संघाच्या १९.२ षटकांमध्ये ५ विकेट पडल्या होत्या. शेवटचे केवळ चार चेंडू क्रुणाल पांड्या याला खेळायला मिळाले. त्यावेळी मुंबई इंडियन्स संघाच्या १८८ धावा होत्या. पण क्रुणाल पांड्या याने चार चेंडूत २ षटकार आणि २ चौकार मारले. यामुळे संघाच्या धावा २०० धावांच्या पुढे जाऊन पोहोचल्या.

कृणाल पांड्याने फक्त चार चेंडूत वीस धावा केल्या आणि नाबाद राहिला. तसेच या सामन्यात क्रुणाल पांड्या याने आयपीएलमध्ये एका डावात सर्वात जलद धावा करण्याचा विक्रम केला आहे. डाव्या हाताचा फलंदाज कृणाल पांड्या हा २० धावा करणारे पहिला खेळाडू ठरला आहे.

एका डावात ३ चेंडूमध्ये १० आणि त्यापेक्षा जास्त धावा करण्यानंतर हा सर्वात उत्तम स्ट्राईक रेट आहे. या धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने २० षटकात ५ विकेट गमावून २०८ धावा केल्या. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाच्या खेळाडूंनी १४ षटकार आणि १५ चौकार मारले. अश्या रितीने फक्त २० धावा करून कृणाल पांड्याने विक्रम आपल्या नावावर करून घेतला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.