कृणाल पांड्याची पहील्याच सामन्यात ३१ चेंडूत ५८ धावांची धडाकेबाज खेळी; बापाच्या आठवणीत भर मैदानात रडला..

सध्या टीम इंडियाविरूद्ध इंग्लंड एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडिअममध्ये खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. भारताने धडाकेबाज फलंदाजी करत इंग्लंडला ३१८ धावांचे लक्ष्य दिले आहे.

यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या वनडे पदार्पणातच कृणाल पंड्याने अर्धशतक झळकवले आहे. ३८ चेंडूत त्याने ५८ धावांची खेळी केली. तसेच गब्बर शिखर धवनने ९८ धावांची धमाकेदार खेळी करत भारताचा डाव सावरला. पण त्याला आपले शतक पुर्ण करता आले नाही.

विराट कोहलीनेही ५६ धावांची खेळी केली आहे. त्यानंतर राहुलनेही आपले अर्धशतक झळकवले. कृणाल पंड्यासोबत आज वनडेमध्ये वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा यालाही संधी देण्यात आली आहे. दरम्यान, २९ वर्षीय कृणाल पंड्यासाठी आंतरराष्ट्रीय सामना काही नवीन नाही.

२०१८ मध्येही त्याने टी २० आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पण एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाकडून खेळण्याची संधी त्याला पहिल्यांदाच मिळाली आहे. यावेळी पदार्पन करणाऱ्या दोन्ही खेळाडूंना टीम इंडियाच्या खेळाडूंनी संघाची निळी टोपी दिली.

त्यावेळी टीम इंडियाची टोपी हातात घेताना कृणाल खुप भाऊक झाला. त्याला त्याच्या भावाने म्हणजे कृणालने टोपी सुपूर्त केली. त्याने ती कॅप घेतली आणि वरती आकाशाच्या दिशेने हलवली आणि आपल्या वडिलांना आदरांजली वाहिली. जानेवारीत त्याच्या वडिलांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.