कृष्णप्रकाश यांच्या वेशांतर करून मध्यरात्री पोलीस ठाण्यांना अचानक भेटी, बेजबाबदार पोलिसांना फुटला घाम

पिंपरी । अनेकदा सर्वसामान्य लोकांना कायद्याने देखील न्याय देताना भेदभाव होतो. पोलीस त्यांना चांगली वागणूक देत नाहीत. यामुळे सामान्य माणसाची फरफट होते. या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून शहरात फेरफटका मारला.

त्यांनी पोलीस ठाण्यांना भेट दिली. तसेच शहरातील नाकाबंदीचीही पाहणी केली. यावेळी त्यांना कोणीही ओळखले नाही. पिंपरी शहरातील पोलीस सामान्य नागरिकांशी नीट वागत नसल्याच्या तक्रारी आहेत.

अशा अनेक तक्रारी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे गेल्या आहेत. यामुळे यांनी स्वत: याबाबत खात्री करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वेशांतर करून शहरातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये ते फिरले.

त्यांनी मोठी दाढी चिटकवली तसेच डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग देखील चढवला. सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे आणि इतर दोन पोलीस यांनीसुध्दा वेशांतर करून आयुक्तांसोबत होते. यामुळे त्यांनाही कोणी ओळखले नाही.

त्यांनी शेजाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णवाहिका ८००० रुपयांची मागणी करीत आहे. ही आमची लुट आहे, अशी तक्रार त्यांनी केली. मात्र तेथील पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. हे आमचे काम नाही, असे त्यावेळी हजर असलेल्या पोलिसाने आयुक्तांना सांगितले.

यावेळी ते चांगलेच चिडले त्यांनी मास्क काढताच गोंधळ उडाला, तसेच ते वाकड पोलीस ठाण्यांमध्ये गेले. आमचा रमजान सुरू आहे. परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो. त्यांना हटकले असता, काहींनी माझ्या बायकोची छेड काढून मला लाथा मारल्या, अशी तक्रार केली.

याठिकाणी त्यांना चांगला अनुभव आला पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. तसेच तक्रार नोंदवून घेण्याची तयारी करून वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. घाबरू नका, उशीर झाला तर आम्ही तुम्हाला घरी सोडू, असे सांगितले.

त्यानंतर कृष्ण प्रकाश यांनी आपली ओळख सांगितली. तसेच तेथील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यानंतर मात्र त्यांनी कामचुकार पोलिसांची कानउघाडणी केली. ते बेजबाबदार पोलिसांना मेमो पाठवणार आहेत. तसेच चांगले काम करणाऱ्यांना ते रिवॉर्ड देणार आहेत.

ताज्या बातम्या

कटप्पाने बाहूबलीला का मारले ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी ‘या’ मराठी अभिनेत्याला लाच देण्याचा प्रयत्न केला पण…

विहिरीतून पाणी काढण्यासाठी गावकऱ्यांचा भन्नाट जुगाड; पहा तुफान व्हायरल व्हिडिओ

२५ लोकांची खिंड एकट्या नवरदेवाने लढवली, पुर्ण मंडपात एकटाच वेड्यासारखा नाचला, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.