Share

Krishna Andhale : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे तृतीयपंथीयांच्या वेशात? नवीन माहिती आली समोर

Krishna Andhale : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. अनेक तर्क-वितर्क लावले जात असले तरी तो जिवंत आहे की नाही, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या एका नव्या खुलाशाने चर्चांना अधिक धार आली आहे.

कृष्णा आंधळे तृतीयपंथीयांच्या वेशात?

सोमवारी (ता. १७) *तृप्ती देसाई यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी *कृष्णा आंधळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात तृतीयपंथीयांच्या वेशात लपून बसल्याचा धक्कादायक दावा केला.

“मध्यंतरी मला एक फोन आला होता, त्यात समोरच्या व्यक्तीने सांगितले की, कृष्णा आंधळे महाराष्ट्र-कर्नाटक बॉर्डर भागात तृतीयपंथीयांच्या वेशात राहात आहे. त्याचे बीड जिल्ह्यातील अनेक तृतीयपंथीयांशी चांगले संबंध होते. त्यामुळे तो त्या समुदायात लपून राहू शकतो,” असे तृप्ती देसाई यांनी सांगितले.

पीडित कुटुंबाच्या भावना – तातडीने न्यायाची मागणी

देशमुख यांच्या कुटुंबीयांनी लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, “आई म्हणत होती की, जसे माझ्या मुलाला तडफडून मारले तसेच आरोपींनाही शिक्षा झाली पाहिजे.” त्यांनी आणखी स्पष्ट केले की, सत्तेच्या जोरावर अनेक गुन्हे दडपले जातात, मात्र हे प्रकरण सर्वांनी उचलून धरल्यामुळे न्यायाची लढाई पुढे गेली आहे.

कृष्णा आंधळे कोण आहे?

संभाजीनगरमध्ये पोलिस भरतीची तयारी करणारा *कृष्णा आंधळे गुन्हेगारीच्या मार्गावर गेला. याआधीही त्याच्यावर संभाजीनगरमध्ये गुन्हे दाखल आहेत. **घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तो पत्र्याच्या घरात राहायचा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याने *तो गेल्या काही महिन्यांपासून फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस तपास आणि पुढील दिशा

तृप्ती देसाई यांच्या या नव्या दाव्यामुळे पोलिस तपासाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. कृष्णा आंधळे तृतीयपंथीयांच्या वेशात राहत असल्याच्या शक्यतेमुळे पोलीस त्या दिशेने तपासाचा फोकस वाढवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी हा तपास किती लवकर पूर्ण होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now