Homeताज्या बातम्याकृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिराने ओलांडल्या सर्व मर्यादा, शेअर केला बिकीनी घातलेला हॉट...

कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिराने ओलांडल्या सर्व मर्यादा, शेअर केला बिकीनी घातलेला हॉट फोटो

कॉमेडियन आणि अभिनेता ‘कृष्णा अभिषेक’ची पत्नी कश्मीरा शाह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रुपेरी पडद्यावर ती कमी दिसत असेल, पण तिच्या बोल्डनेसने ती चाहत्यांची धडधड वाढवत राहते. आता कश्मिरा शाहने तिचा बेडरूमचा फोटो पोस्ट केल्याने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. या फोटोत कश्मिराची बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे.

कश्मीरा शाह 49 वर्षांची आहे, परंतु हॉटनेसच्या बाबतीत ती तरुण सुंदरींना मागे टाकते. कश्मिराने तिचा एक लेटेस्ट फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे, जो पाहून चाहते वेडे झाले आहेत. कश्मिरा रेड कलरची बिकिनी परिधान करून बेडवर पडली असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. तिने निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे पण तिने बटण लावलेले नाही. कश्मिराचा हा फोटो इंटरनेटवर आगीसारखा पसरत आहे.

https://www.instagram.com/p/CYaodBvrBT6/?utm_source=ig_web_copy_link

कश्मिराचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंनी भरले आहे. कश्मीरा शाहने तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या कृष्णा अभिषेकसोबत लग्न केल्याची माहिती आहे. दोघांची प्रेमकहाणी 2005 मध्ये सुरू झाली. ‘और पप्पू पास हो गया’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जयपूरमध्ये हे दोन्ही स्टार्स पहिल्यांदा भेटले होते.

कश्मीरा तेव्हा निर्माता ब्रॅड लिस्टरमनची पत्नी होती. 2007 मध्ये काश्मिराने ब्रॅड लिस्टरमनला घटस्फोट दिला आणि कृष्णा (कृष्णा अभिषेक) सोबत लिव्ह-इन करायला सुरुवात केली. यानंतर 2013 मध्ये कश्मीरा आणि कृष्णाचे लग्न झाले. कृष्णा आणि कश्मिरा मे 2017 मध्ये जुळ्या मुलांचे पालक झाले. सरोगेसीच्या माध्यमातून मुलांचा जन्म झाला.

कश्मीरा शाहने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 1996 मध्ये तेलगू चित्रपटातील आयटम नंबरने तिच्या करिअरला सुरुवात केली. यानंतर तिने ‘येस बॉस’ चित्रपटात छोटी भूमिका साकारली. याशिवाय तिने ‘प्यार तो होना ही था’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘हेरा फेरी’, आंखे, मर्डर आणि वेकअप सिड (2009) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतीच ती ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोमध्येही दिसली होती.