Konkan Railway Bharti 2025 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) अंतर्गत १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी नोकरीची संधी चालून आली आहे. ७९ पदांवर भरती प्रक्रिया सुरू होत असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून २३ जुलै २०२५ पासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०२५ असून, या तारखेच्या दिवशीच मुलाखत होणार आहे.
एकूण पदे : ७९
पदांचे तपशील:
ट्रॅक मेंटेनर (Track Maintainer) = ३५
पॉइंट्स मॅन (Pointsman) = ४४
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त मंडळातून १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
०१ ऑगस्ट २०२५ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ४४ वर्षांदरम्यान असावे.
परीक्षा शुल्क:
सामान्य उमेदवारांसाठी ८५५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
पगार श्रेणी:
निवड झालेल्या उमेदवारांना ₹१८,०००/- इतका प्रारंभिक पगार मिळेल.
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. १२ ऑगस्ट २०२५ रोजीच ही मुलाखत घेण्यात येणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : २३ जुलै २०२५
मुलाखतीची तारीख : १२ ऑगस्ट २०२५
अधिकृत संकेतस्थळ : https://konkanrailway.com/
जाहिरात पाहा : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा : येथे क्लिक करा






