त्यावेळी मला मरावंस वाटत होतं; दिपीकाने सांगीतला ‘तो’ भयानक किस्सा; अशी वेळ कुणावरही येऊ नये…

कोन बनेगा कोरोडपती १३ या कार्यक्रमात दीपिका आणि फराह खान या दोघी कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी दीपिकाने खूप गप्पा मारल्या. यावेळी तिने तिच्या जीवनातले अनेक किस्से सांगितले दरम्यान अमिताभ बच्चन यांना तिने जीवनातील अतिशय संवेदनशील घटना सांगितली.

यावेळी अमिताभ बच्चन समोर दीपिकाने कबूल केले की ती नैराश्याची शिकार झाली होती. आणि हे सांगण्यात किंवा त्याबद्दल बोलण्यात काहीच वाईट नाही, असे ती म्हणाली. शुक्रवारी दीपिका पदुकोण आणि फराह खान ‘कौन बनेगा करोडपती 13’ च्या विशेष भागात पोहोचली. शोचे होस्ट अमिताभ बच्चन समोर बसले होते.

या दरम्यान, दीपिकाने तिच्या नैराशेचा (depression) अनुभव शेअर केला. वेदना सांगताना केवळ दीपिकाच नाही तर अमिताभ बच्चनही भावूक झाले. दीपिका म्हणाली की हा एक काळ होता जेव्हा तिची जगण्याची इच्छा संपली होती.

अमिताभ बच्चन यांनी दीपिकाला विचारले की, तुला कधी कळले की तु नैराश्यात आहे? यावर दीपिका म्हणाली, ‘मला एक एकटेपणा जाणवायचा.’ तिच्या नैराश्याशी लढताना दीपिका म्हणाली, ‘एक काळ होता जेव्हा मला कामावर जायचे नव्हते. मला कोणालाही भेटण्याची इच्छा नव्हती. मला काही करायचे नव्हते. कित्येकदा असे घडले की… मला माझ्या नैराश्याविषयी कोणाला सांगू की नको हेही कळत नव्हते, मला जगण्याची इच्छा देखील नव्हती..हे सांगताना दिपीका भावूक झाली.

दिग्दर्शक फराह खानने यादरम्यान आणखी एक खुलासा केला. तिने अमिताभ बच्चन यांना सांगितले, ‘जेव्हा दिपीका नैराश्यात होती, तेव्हा ती आमच्या’ हॅप्पी न्यू इयर ‘चित्रपटाचे शूटिंग करत होती. ती कोणत्या परिस्थितीतून जात होती याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आम्ही विचार देखील केला नव्हता की दीपिका अशा परिस्थितीमधून जात होती.

 

 

महत्वाच्या बातम्या
मोदी शहांचे पुन्हा धक्कातंत्र! भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री; जाणून घ्या कोण आहेत भूपेंद्र पटेल
VIDEO: नाकात नथ, अंगावर नऊवारी साडी; गणपती बाप्पाच्या आगमानानिमित्त राजेश्वरी खरातचे खास नृत्य
“जाताय तर जा पण जाता जाता १२ आमदारांच्या फाईलवर सही करून जा, तेवढंच पुण्य मिळेल”
महाराष्ट्रात ढगफूटीचा कहर! आतापर्यंत देशात एक नंबर; वाचा तज्ञांचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.