Share

Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकरांनी माफी मागीतली नाही तर त्यांना सडके मासे खाऊ घालू; कोळी महीला का संतापल्या? जाणून घ्या…

Varsha Usgaonkar

Varsha Usgaonkar : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर सध्या चर्चेत आल्या आहेत. नुकतीच वर्षा उसगावकर यांनी ऑनलाइन मासे विकत घेणाऱ्या ॲपसाठी एक जाहिरात केली. मात्र, हीच जाहिरात त्यांना महागात पडली आहे. या जाहिरातीमुळे त्या चर्चेत आहेत.

या जाहिरातीत त्यांनी मासे विक्रेत्या कोळी महिलांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर कोळी महिलांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वर्षा उसगावकर यांनी आमची माफी मागावी. अन्यथा त्यांना सडलेले मासे खाऊ घालू, असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या महिला अध्यक्षा नयना पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच दोन वेळेच्या जेवणासाठी जीवाचे राण करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अपमान आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज महिला कलाकाराकडून एका कष्टकरी महिलेचा अपमान होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. यातून गरिबांविषयीची मानसिकता स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या महिला अध्यक्षा नयना पाटील यांनी मासे विक्रेत्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे. यात वर्षा उसगावकर यांनी जर मासे विक्रेत्या कोळी महिलांची माफी मागितली नाही, तर त्यांच्या शूटिंगच्या सेटवर जाऊन त्यांना सडलेले मासे खाऊ घालण्याचा निर्णय मुंबईतील मासे विक्रेत्या महिलांनी घेतला आहे.

तसेच ही जाहीरात ज्या ऑनलाइन कंपनीने टाकली आहे, त्यांनी कोळी महिलांची माफी मागावी. असे न केल्यास त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यासोबतच समितीचे उपाध्यक्ष ऍड. कमळाकर कांदेकर यांनीही या प्रकरणावर वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सर्व प्लॅटफॉर्मवरून ही जाहिरात काढून टाकावी, नाहीतर कोर्टात कंपनीच्या विरोधात दावा दाखल केला जाईल. तसेच मच्छी विक्रेत्या कोळी महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

यासोबतच कोळी महिलांकडून वर्षा उसगावकर यांना अनेक सवालही करण्यात आले आहेत. कोळिणींच्या पतीच्या स्वत:च्या मासेमारी नौका असताना त्या खराब मासळी का विकतील? ऑनलाइन ॲपवाली मंडळी कोणत्या बोटीने मासेमारी करतात?, असे प्रश्न कोळी महिलांकडून विचारण्यात आले आहेत.

“मला मासे खायला आवडतात. ते ताजे आहेत की नाही याची चव मला लगेच कळते. परंतु, बाजारात मासे घ्यायला जाते तेव्हा ते मासे ताजे आहेत की नाही हे त्यावेळी कळत नाही, म्हणून तेव्हा माशांची निवड करता येत नाही. त्यामुळे बाजारात जाते तेव्हा अनेकदा माझी कोळणींकडून फसवणूक झालेली आहे.”

“विशेषतः जे पापलेट बाजारात खूप ताजे असल्यासारखे वाटतात. त्या पापलेटला घरी आल्यानंतर इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले असे मला वाटले व मी निराश झाले. त्यावेळी माझ्या आयुष्यात हे खासगी ॲप वरदान स्वरूपात आले,”‘ असे वर्षा उसगावकर या जाहिरातीत म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या
Navneet Rana : नवनीत राणांचा पोलिस स्टेशनमध्ये राडा, अधिकाऱ्यांवर बरसल्या, पोलिसांचेही जशास तसे प्रत्यूत्तर
‘या’ कारणामुळे २ महिन्यातच मुख्यमंत्री शिंदेंना वैतागले अधिकारी; वाचा नेमकं असं काय घडलं?
…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now