‘…अन् पोलिसांनी थेट राजू शेट्टींच्या कॉलरला घातला हात’, आंदोलनात कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने

मुंबई | दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता महाराष्ट्रापर्यंत पोहचली आहे. कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात वादावादी झाली. यामुळे पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आलेले पाहायला मिळाले.

आज स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शाह कोण आहेत? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी विचारला आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूर, पुणे, बारामती, औरंगाबादेत आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला वेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. यामध्ये पोलिसांनी थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या कॉलरला पोलिसांनी हात घातला. त्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच संतापले. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

केंद्र सरकार चुकीची वागणूक देतंय…
‘दिल्लीत बसलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार चुकीची वागणूक देत आहे. या पाषाणहृदयी सरकारला शेतकऱ्यांची दया आली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून पत्रव्यवहार करतोय. केंद्रानं कुठलाही शेतकरी, कुठल्याही शेतकरी संघटनेसोबत चर्चा केली नाही. मग हे कायदे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा अधिकार सरकारला कुणी दिला? असा सवाल शेट्टी यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या
मुंबईत ‘सुपर स्प्रेडर’चा धोका वाढण्याची शक्यता, BMC कडून ‘मास टेस्टिंग’ची मोहिम
काही महिन्यांत भारतीयांना मिळणार प्रभावी कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून माहिती
चिंतेत भर! करोनाच्या लक्षणांमध्ये बदल; नाकावाटे करू शकतो मेंदूत शिरकाव; नवा निष्कर्ष

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.