kolhapur jyotiba property | कोल्हापूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थानच्या मालकीची चारशे एकर जमीन परस्पर विक्री केली आहे. याप्रकरणी आता देवस्थानच्या समितीने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
जमीन विक्रीच्या या प्रकरणात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असल्याचेही म्हटले जात आहे. तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांच्या पुढाकारानेच हे सगळे प्रकार घडले असून याची चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते आणि देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे.
ज्योतिबा देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. असे असताना अचानक असा प्रकार समोर आल्यमुळे एकच खळबळ उडाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जमिनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता हा सगळा प्रकार उघडकीस झाला आहे.
देवस्थान समितीकडे असलेल्या ज्योतिबाच्या मानाच्या सासनकाठ्या नोंदणीच्या वेळी, कसायला दिलेल्या जमिनीची कागदपत्र दाखवण्याची अट घातल्याने हा प्रकार समोर आला आहे. ज्योतिबा देवस्थानाकडे हजारो एकर जमीन आहे. त्यामधील ५०, १०० आणि २०० एकर जमीन महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील मानकरांकडे आहे.
काही वर्षानूवर्षे देवस्थानची जमीन देवाच्या नावाने कसणाऱ्या अनेक लोकांनी देवस्थानचं नाव काढले आहे. तसेच तिथे त्यांनी आपलं नाव लावलं आहे. जी पहिली पिढी देवाच्या नावाने जमिनी कसत होत्या, त्याच पिढीने आपल्या दुसऱ्या पिढीच्या नावावरच त्या जमिनी केली का काय? अशी शंका निर्माण होत आहे.
या सगळ्या गोष्टींना तत्कालीन सरकार कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच आता नक्की कारवाई कोणावर करायची असाही प्रश्न निर्माण झाला आहे. महेश जाधव यांनी आरोप केल्यानंतर आता याची चौकशी सुरु झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
..अन् भर सभेत शर्मिला ठाकरे म्हणाल्या, माझा नवरा आलाच आहे तर कापूनच टाकते त्याला पुर्ण
रितेशच्या वेड चित्रपटातून ‘या’ बालकलाकाराने लावलंय प्रेक्षकांना वेड; तिची आई सुद्धा आहे प्रसिद्ध…
Samadhan maharaj sharma : काय सांगता? महाराजांना कीर्तनाला उशीर होऊ नये म्हणून पुणेकरांनी केली हेलिकॉप्टरची सोय