हृदयद्रावक! कोरोनावर मात करुन पटकन घरी येतो, असे म्हणणारे आईबाबा घरी परतलेच नाही

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले. दिवसाला राज्यात हजारो रुग्ण भेटत आहे. अशात कोरोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यु झाला आहे. कोरोनाने अनेक कुटुंबांना उधवस्त केले आहे. अशीच एक धक्कादायक घटना कोल्हापुरमध्ये घडली आहे.

कोल्हापुरच्या शाहुवाडी तालुक्यातील मलकापुरमध्ये महादेव गणपती पाटील आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यु झाला आहे. त्यांच्यामागे त्यांच्यी दोन मुले आता पोरकी झाल्याने त्या मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

महादेव पुण्याच्या एका कंपनीत मोठ्या पदावर कामाला होते. पण लॉकडाऊनमुळे पत्नी आणि मुलांसोबत ते मुळगाव शित्तुरतर्फे मलकापुरला आले होते. काही दिवसांपुर्वी सीमा यांना त्रास होत होता, त्यामुळे तेव्हा शंका नको म्हणून कोरोना टेस्ट केली. त्यावेळी पती पत्नी दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आले आणि त्यांची दोघेही मुले निगेटिव्ह आली.

त्यांना पुर्वा आणि तन्मय अशी दोन मुली होती. त्रास होत असल्याने दाम्पत्य रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयात दाखल होण्याआधी त्यांनी नऊ वर्षाच्या पुर्वाला आणि सहा वर्षाच्या तन्मयला धीर दिला होता.

बाळांनो काळजी करु नका, आम्ही लवकरंच घरी परत येऊ, असे म्हणत ते रुग्णालयात गेले होते. पण नियतीला ते मान्य नव्हतं. बुधवारी सीमा यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाली. पत्नीच्या मृत्युची बातमी कळताच महादेवही खचले आणि त्यांची प्रकृती बिघडली. महादेव यांचे गुरुवारी निधन झाले.

घरी लवकर येतो असे म्हणणारे आईबाबा अजूनही आले नाही. त्यांची मुले आपल्या आईवडिलांची वाट बघत आहे, पण त्यांना काय माहित की त्यांचे आईवडिल परत कधीच येऊ शकणार नाही. चिमुकल्यांना अजूनही सांगण्यात आले नाही, की त्यांचे आईवडिल परत कधीच येणार नाही.

या दाम्पत्यावर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहे. महादेव यांचा मोठा भाऊ क्वारंटाईन असल्याने त्यांना येता आले नाही. तर मुलांना कोरोनाची लागण होईल म्हणून त्यांना नेण्यात आले नाही. त्यामुळे मुलांना अंतिम दर्शनही घेता आले नाही.

महत्वाच्या बातम्या-

पत्नीच्या नकळत पतीने बसवला घरात कॅमेरा, नंतर समोर आला ‘हा’ घाणेरडा प्रकार
शरीर पिळदार असले तरी कोरोना कोणाला सोडत नाही; मिस्टर इंडिया जिंकलेल्या बॉडीबिल्डरचे निधन
बेंजोसोबत ढोलकीच्या तालावर गाणं म्हणणारी ही चिमुकली पाहून छाती गर्वाने फुगेल; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.