संसदेत जेव्हा मोदी सरकार १०२ वी घटनादुरूस्ती करत होते तेव्हा संभाजीराजेंनी तोंड का उघडले नाही?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर टिका केली जात आहे. तर मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढे यावे अशी मागणी राज्य सरकारकडून केली जात आहे.

अशात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन खासदार संभाजीराजे आक्रमक झालेले दिसून येत आहे. सध्या संभाजीराजे महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. तसेच वेगवेगळ्या भागातील समाज बांधवांच्या भेटी घेऊन त्यांच्या भावना समजावून घेत आहे.

तसेच संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. तसेच पत्रकार परिषदेत ते खुप आक्रमक दिसत होते. त्यांनी ६ जुन म्हणजेच शिवराज्यअभिषेक दिनाचा अल्टिमेटम दिला आहे. यावर आता सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षानेही प्रतिक्रिया दिल्या आहे.

असे असताना माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनीनी संभाजीराजेंच्या आक्रमकतेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच घटना दुरुस्तीवर भाष्य करत त्यांनी संभाजीराजेंवर टिका केली आहे.

घटना संसदेत जेव्हा सरकारने १०२ वी दुरुस्ती केली, त्यावेळी तिथे हजर असताना संभाजीराजे यांनी तोंड का उघडले नाही?, असा सवाल कोळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देणे, केंद्राच्या हातात आहे, तसेच ते मिळायला पण पाहिजे. पण सध्या मराठा आरक्षणावरुन फक्त राजकारण केले जात आहे. संभाजीराजेंनी ज्या मागण्या केल्या आहे. त्याच्यावरुन फक्त मराठ्यांच्या नावाने राजकारण करण्याचा हेतू दिसून येत आहे, असेही कोळसे पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

एका मळक्या कपड्यातील शेतकऱ्यानं अख्ख पोलीस स्टेशन सस्पेंड केलं होतं; वाचा पुर्ण किस्सा
अमिताभसोबत सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करणारे गोगा कपूर बॉलीवूडमधून गायब का झाले? वेगळीच माहिती आली समोर
अग्गबाई सासूबाई…! प्रार्थना बेहरे पेक्षाही सुंदर आहेत तिच्या सासूबाई, पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.