धक्कादायक! सेक्सवर्धक औषधांच्या ओव्हरडोसने आंतरराष्ट्रीय पैलवानाचा मृत्यू, वाचा नेमके प्रकरण…

मथुरा | मथुरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आंतराष्ट्रीय पैलवान कुंवर पाल यांचा सेक्सवर्धक औषधाच्या अतिसेवनाने मृत्यू झाला आहे. पण त्यांना हा ओव्हरडोस एका महिलेने दिला होता.

त्या महिलेला मथुरा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी स्वतः कुंवर पाल यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे. मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या शरीरात सेक्सवर्धक औषधाचे प्रमाण जास्त आढळलं आहे.

एसपी शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाल यांच्या मृत्यूच्या आरोपाखाली ज्या महिलेला अटक करण्यात आलेली आहे ही महिला कुंवर पाल यांच्यासोबत वृंदावन आश्रमात राहत होती.

तसेच एसपी शंकर असेही म्हणाले की, या महिलेसोबत पाल यांचे अनेक वर्षांपासून शारीरिक संबंध होते. आश्रमातील त्या दिवशीचा घटनाक्रम सांगितला आहे. पाल आणि त्या महिलेने त्या दिवशी एकत्र जेवण केले होते. त्यानंतर त्यांनी शक्तिवर्धक औषधे घेतली.

त्या औषधांच्या ओव्हरडोसमुळे त्यांचा मृत्यू झाला. ते दोघे ज्या रूममध्ये होते त्या रूममध्ये पोलिसांना औषधाची बाटली सापडली आहे. पाल यांच्या मृत्यूनंतर आरोपी महिलेने पैलवान कुमार पाल यांना रस्त्यावरच फेकून देत पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेतला आणि औषधाची बाटली ताब्यात घेतली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.