शाकाहार समजून मांसाहार तर करत नाहीत ना? जाणून घ्या ‘या’ पदार्थांमध्ये आहे मांसाहारी घटक

शाकाहारी लोकांचे नियम खूपच कडक असलेले पाहायला मिळतात. अनेक लोक तर जिथे मांसाहारी जेवण बनवलं जात त्या ठिकाणी जातही नाहीत. पण काही पदार्थ आपण शाकाहारी समजून खात असतो मात्र ते पदार्थ पूर्णपणे शाकाहारी नसतात.

असे अनेक पदार्थ आहेत जे वर पाहता शाकाहारी असतात पण त्यात असे काही घटक वापरतात की ते मांसाहारामध्ये मोडले जातात. तसेच काही पदार्थांमध्ये ॲनिमल प्रॉडक्ट वापरलेले असतात. त्यामुळे हे पदार्थ विकत घेताना त्यावरीललेबल  पाहून घ्यावं. आज आपण असेच काही पदार्थ पाहणार आहोत.

चीज- अनेक लोकांना रोजच्या जेवणात चीज खायला फारच आवडते. तसेच बऱ्याच लोकांना ब्रेकफास्ट, स्नॅक्स मध्येच चीज वापरायची सवय असते. खरं पाहता लहान मुलांना चीज सगळ्यात जास्त आवडतं.

चीजमध्ये रेन्नेट मिसळलेलं असतं. हे एक प्रकारचं एंजाइम आहे जे वासरांच्या पोटा मधून मिळतं. चीज घट्ट करण्यासाठी हे वापरलं जातं. बाजारामध्ये शाकाहारी चीज देखील मिळतं ज्यामध्ये रेन्नेट वापरलेलं नसतं. त्यामुळे चीज घेताना त्यावर लेबल तपासून घ्या.

10 Best Cheeses For The Health - प्राटीन, कैल्श्यिम से भरपूर ये 10 चीज़ हैं सेहत के लिये बेस्ट | Patrika News

चॉकलेट- काही पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड नसतं मात्र, तरीदेखील त्यात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड घालून त्यांना बाजारामध्ये विकलं जातं. असे पदार्थ शाकाहारी नसतात. यांच्यामध्ये माशांमधून मिळणारे ऑईल वापरलं जातं. तसेच आळशी, सब्जा आणि अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड नैसर्गिकरीत्या आढळतं.

सॉफ्ट ड्रिंक – सॉफ्ट ड्रिंक बनवताना त्यामध्ये जिलेटिन वापरलं जात. यामुळेच पदार्थाला घट्टपणा येतो. परंतु जिलेटीन हा जनावरांच्या शरीरामधून मिळणारा पदार्थ आहे. सगळ्याच सॉफ्ट ड्रिंकमध्ये जिलेटीन वापरलं जात नसलं तरीदेखील आपण सॉफ्टवेअर खरेदी करताना या गोष्टीची काळजी घेण गरजेच आहे.

Why Is Soft Drink Dangerous For Health? Know What Are The Consequences Of Drinking It | सॉफ्ट ड्रिंक क्यों है सेहत के लिए खतरनाक, जानें- इसको पीने के क्या हैं परिणाम?

साखर- सगळ्यांच्या रोजच्या जीवनात साखरेचा उपयोग हा होतच असतो. पण हे माहित आहे का की, साखर सफेद बनवण्यासाठी त्यासाठी बोन चार किंवा नॅचरल कार्बन वापरून ब्लिचिंग केलं जातं. यासाठी प्राण्यांच्या हाडांपासून मिळणाऱ्या भुकटीचा वापर केला जातो. कन्फेक्शनर आणि ब्राऊन शुगरमध्ये सुद्धा हेच वापरलं जातं.

व्हॅनिला आईस्क्रीम- अनेकांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. व्हॅनिला आईस्क्रीममध्ये फ्लेवर येण्यासाठी जनावरांच्या शरीरातून मिळणारे काही पदार्थ वापरले जातात. यालाच केस्टोरम म्हटलं जातं. फ्लेवरसाठी व्हॅनिला आईस्क्रीममध्ये केस्टोरम वापरलं जातं. केस्टोरम खाल्ल्यामुळे शरीराला कोणतेही नुकसान होत नसलं तरी अशाप्रकारे बनवलेलं व्हॅनिला आइस्क्रीम मांसाहारी असतं.

Vanilla Ice Cream - वनीला आइसक्रीम कैसे बनाएं - Cooking Pitara

नॉन ऑरगॅनिक केळी – नॉन ऑरगॅनिक केळ्यांमध्ये झिंगा आणि खेकडे यांचा वापर केला जातो. झिंगा आणि खेकड्यांमध्ये आढळणाऱ्या पदार्थांमध्ये बॅक्टेरियाविरुद्ध लढण्याची क्षमता असते. ज्यामुळे केळ्यांचं प्रिजर्वेशन होतं. त्यामुळे उपवासाकरता केळी खरेदी करताना ती पूर्णपणे ऑरगॅनिक असल्याची खात्री करून घ्या.

खारे शेंगदाणे – काही ब्रांडेड कंपन्यांचे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी आणि मसाल्याबरोबर जिलेटिन वापरतात. जिलेटिन जनावरांच्या हाडांपासून तयार होतं.

खारे शेंगदाणे | salted peanut | salt roasted peanut - YouTube

बार्बेक्यु फ्लेवर बटाटा वेफर्स – बाजारा मध्ये मिळणारे बार्बेक्यु बटाटा फ्लेवर चिप्स पूर्णपणे शाकाहारी नसतात. यामध्ये चिकन फॅट वापरलं जात. त्यामुळेच अशा प्रकारचे चिप्स खरेदी करताना त्यावरील लेबल पाहून घ्या.

व्हेजिटेबल सुप – मार्केटमध्ये मिळणाऱ्या व्हेजिटेबल सुपमध्ये चिकन किंवा बीफच्या हाडांपासून मिळणारे पदार्थ वापरले जातात. त्यामुळेच हे सूप व्हेजिटेबल सूप म्हणून खरेदी करत असाल तरी, देखील त्यावरचं लेबल वाचा आणि शक्य असल्यास सूप घरीच बनवा.

हार्ड कोटेड कॅन्डीज – हार्ड कोटेड कॅन्डीजमध्ये शेलॅक वापरलं जातं. जे एका किड्याच्या स्त्रावांमधून तयार होतं. शेलॅकचा वापर फर्निचर पॉलिश, हेअर स्प्रे आणि कृषी उत्पादनांमध्ये केला जातो. हार्ट कॉटेड कॅन्डीज पॅकिंगवर असा उल्लेख असेल तर खरेदी करू नका.

हे ही वाचा-

पूजा लोंढे हत्या प्रकरणी माहेर सिन्नरमध्ये तीव्र आक्रोश, नागरिक रस्त्यावर, नराधमांवर कारवाईची मागणी

मुली काही करु शकत नाही म्हणणाऱ्या लोकांना लव्हलिनचे सडेतोड उत्तर; टोकियोत भारताला मिळवून दिले पदक

पूरग्रस्त भागात ३ दिवसात ११३७ किलोमीटर फिरलो, आता राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.