तुमचं PAN Card व्हेरिफाय करायचंय? ‘या’ पद्धतीचा वापर करा २ मिनिटांत होईल काम

मुंबई | आपल्या दैनंदिन व्यवहारात आपल्याला सर्व कागदपत्रांची गरज असते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे पॅन कार्ड. बँकेतील कामांसाठी पॅन कार्डची गरज असते. आणि त्यावरतील माहितीही अचूक लागते.

याचबरोबर यावर १० अंकी यूनिक अल्फान्य़ूमेरिक नंबर असतो, तो क्रमांक तुमची ओळख असते. आयकर विभागाकडून हे कार्ड जारी केले जाते. अशावेळी तुमचे पॅन कार्ड व्हेरिफाय केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र PAN Card व्हेरिफाय करायचे कसे? याबाबत माहिती घेणार आहोत.

तुम्हाला जर तुमचे पॅन कार्ड व्हेरिफाय करायचे असेल तर यासाठी तुम्हाला इनकम टॅक्सची अधिकृत वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in वर जावे लागेल. यानंतर Verify Your PAN details वर क्लिक करा. पुढे तुमचा पॅन क्रमांक याठिकाणी एंटर करा. तसेच यानंतर लगेचच तुमचे नाव आणि जन्मतारीख प्रविष्ट करा. ही सर्व माहिती भरल्यानंतर कॅप्चा कोड टाकून डिटेल्स व्हेरिफाय करण्यासाठी सबमिटवर क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड व्हेरिफाय करू शकतो.

घरूनच आपले पॅन कार्ड अपडेट करा..
आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी NSDL या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर वेबसाईटवर सर्व्हिस टॅबवर जाऊन PAN वर क्लिक करा. त्यानंतर Changes or Correction in existing PAN Data / Reprint of PAN Card वर क्लिक करा. मागितलेली माहिती भरुन, कॅप्चा कोड सबमिड करा.

त्यानंतर e-KYC द्वारे कागदपत्र जमा करण्यासाठी आधारकार्डची गरज लागेल. e-sign द्वारे स्कॅन फोटो सबमिट करू शकता. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करावे लागेल. पेमेंट करण्यासाठी Pay Confirm वर क्लिक करा. पेमेंट केल्यानंतर बँक रेफरेंस नंबर आणि ट्रान्झक्शन नंबर मिळेल. हे दोन्ही सेव्ह करून continue वर क्लिक करा.

यानंतर आधार कार्डच्या खालच्या बॉक्सवर टिक करा आणि Authenticateवर क्लिक करा. त्यानंतर continue with e-Sign आणि e-KYC वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Generate OTP वर क्लिक करा. नंतर OTP टाकून सबमिट केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, त्यात ऍप्लिकेशन फॉर्म दिसेल. PDF फॉर्मेटमध्ये तो डाऊनलोड करा. तसेच मेलवरही फॉर्म मिळेल. अशा प्रकारे आपण वेळ आणि खर्च वाचवून घर बसल्या पॅन कार्ड अपडेट करू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या
बेरोजगारांना मोदी सरकार देतंय महिन्याला ३८०० रुपयांचा भत्ता?; वाचा व्हायरल मेसेजमागील सत्य
तुमच्या वाहनाच्या नंबरप्लेटचा शेवटचा आकडा ‘१’ असेल तर ही बातमी वाचाच; भरावा लागू शकतो दंड
‘जीव गेला तरी बेहत्तर पण शरण जाणार नाही’, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी फोडली डरकाळी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.