Share

सच्चा शिवसैनिक, बेळगाव सीमाप्रश्नी आंदोलनात मोलाची भूमिका; जाणून घ्या ‘मावळा’ संजय पवारांबद्दल….

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा लवकरच रिक्त होत आहेत. या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक(Election) होणार आहे. या निवडणुकीसाठी ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. यादरम्यान राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार चर्चा रंगली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेना उमेदवार लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.(know about shivsena kolhapur politician sanjay raut)

या जागेसाठी सुरवातीला संभाजीराजे छत्रपती यांचं नाव आघाडीवर होतं. पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

यासंदर्भातील औपचारीक घोषणा करण्याचे बाकी आहे. आज संध्याकाळपर्यंत संजय पवार यांच्या नावाची राज्यसभेच्या उमेदवारीसाठी घोषणा केली जाऊ शकते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संभाजीराजे छत्रपती यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. संजय पवार शिवसेनेचे मावळे आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षनेते, पदाधिकारी मावळ्यांच्या जोरावर उभे असतात. मावळे असतात म्हणून राजे आहेत”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी संभाजीराजे छत्रपती यांना टोला लगावला आहे.

कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहेत. ९ वर्षांपूर्वी संजय पवार यांना कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख करण्यात आले होते.कोल्हापूरमध्ये संजय पवार यांना मानणारा मोठा गट आहे. त्यांनी कोल्हापूरमध्ये शिवसेना वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. संजय पवार तब्बल तीन वेळा कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

त्यानंतर शिवसेना पक्षाने त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. एक सच्चा शिवसैनिक अशी संजय पवार यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे. बेळगाव-कारवार सीमा प्रश्नी केलेल्या शिवसेनेच्या आंदोलनात संजय पवार यांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव पुढे आले होते.

तेव्हापासून संजय पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. यावर कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला अद्याप पक्षाकडून उमेदवारीसंदर्भात माहिती मिळाली नाही. पण माझ्या नावाची चर्चा होत असल्याचे माझ्या ऐकण्यात आले आहे. मला जर संधी मिळाली तर मला खूप आनंद होईल”, असे संजय पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
“८०० वर्षे जर देव बिनापूजेचा राहत असेल तर यापुढेही तसाच राहील”; कुतुबमिनार प्रकरणात हिंदू पक्षाला कोर्टाने सुनावले
शिवसेनेची ऑफर धुडकावत संभाजीराजे स्पष्टच बोलले; ‘खासदार होवो अगर न होवो…’
मॅकडोनाल्डमध्ये कोल्ड्रिंक पिताना रहा सावध! कोल्ड्रिंकमध्ये निघाली पाल, पहा किळसवाणा व्हिडीओ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now