Share

KL Rahul : ‘हा पुन्हा का जखमी होत नाही?’ राहुलच्या ड्राॅपकॅचमुळे भारताचा पराभव होताच चाहत्यांनी झाप झाप झापले; म्हणाले..

KL Rahul : न्यूझीलंड दौरा संपवून भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर पोहोचला आहे. 4 डिसेंबर रोजी, शेर-ए-बांगला ढाका येथे सकाळी 11.30 वाजल्यापासून वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात होता. नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघ आज प्रथम फलंदाजी करताना दिसला.

भारत 186 धावांवर ऑलआऊट झाला. रोमहर्षक सामन्यात बांगलादेशने 1 गडी राखून विजय मिळवला. शेवटी भारताला विजयासाठी 1 विकेटची गरज होती. केएल राहुलने हातात आलेली सुवर्णसंधी गमावली. या झेलमुळे भारत सामना जिंकू शकला असता. या पराभवानंतर चाहत्यांचा राग केएल राहुलवर वाढला आहे.

केएल राहुल आज शानदार फलंदाजी करताना दिसला. राहुलने 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 73 धावांची शानदार खेळी खेळून भारताला 186 धावांपर्यंत मजल मारता आली. आज केएल राहुल बऱ्याच दिवसांनी भारतासाठी किपिंग करताना दिसला.

ऋषभ पंत बाद झाल्याने केएल राहुलकडे जबाबदारी देण्यात आली. पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे संघात इशान किशनसारखा यष्टिरक्षक फलंदाज होता, मग त्याला संधी का दिली गेली नाही. राहुल आज कीपिंग करताना भारतासाठी अडचणीचा ठरला.

आज राहुलने कीपर म्हणून एक सोपा झेल सोडला ज्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. सोशल मीडियावर चाहते राहुलला पराभवाचे कारण सांगत राहुलला संघातून काढून टाकण्याची मागणी करताना दिसत आहेत.  केवळ 186 धावा असतानाही टीम इंडियाच्या युवा गोलंदाजांनी संघाची लाज वाचवताना सामना जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

मात्र मेहंदी हसनच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने सामना 1 विकेटच्या जवळच्या फरकाने गमावला. अशा स्थितीत सोशल मीडियावर काही चाहते भारतीय फलंदाजीबद्दल प्रचंड संतापले होते, तर काही चाहते भारतीय गोलंदाजीचे जोरदार कौतुक करताना दिसले.

आता भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा वनडे सामना बुधवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून खेळवला जाईल. बांगलादेशने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला १८६ धावांत गुंडाळले. या सामन्यात भारताकडून लोकेश राहुलने खेळलेल्या (७३) अर्धशतकीय खेळीमुळेच भारताला १८६ धावांचा स्कोर उभा करता आला.

https://twitter.com/Onlyam_sUnIl08/status/1599403593731538944?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1599403593731538944%7Ctwgr%5E371ca75275156570ce5c5bc6085c07f802d7f1cd%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fjagrancricket.com%2Fcricket%2Ffans-blame-kl-rahul-for-loss%2F

 

https://twitter.com/sachinkrishnav1/status/1599424524092866562?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1599424524092866562%7Ctwgr%5E371ca75275156570ce5c5bc6085c07f802d7f1cd%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fjagrancricket.com%2Fcricket%2Ffans-blame-kl-rahul-for-loss%2F

https://twitter.com/with_rps/status/1599424533647491074?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1599424533647491074%7Ctwgr%5E371ca75275156570ce5c5bc6085c07f802d7f1cd%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fjagrancricket.com%2Fcricket%2Ffans-blame-kl-rahul-for-loss%2F

https://twitter.com/TotanMo00777600/status/1599424776157638657?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1599424776157638657%7Ctwgr%5E371ca75275156570ce5c5bc6085c07f802d7f1cd%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fjagrancricket.com%2Fcricket%2Ffans-blame-kl-rahul-for-loss%2F

महत्वाच्या बातम्या
Rahul Dravid : राहुल द्रविड सर्वाधिक कमकुवत प्रशिक्षक; ‘हे’ 3 दिग्गज होऊ शकतात टीम इंडियाचे पुढील प्रशिक्षक
याला म्हणतात शिवरायांचा कट्टर मावळा! महाराजांचा वारसा जपण्यासाठी बांधलं किल्ल्यासारखं घर
Yashvardhan Singh : अवघ्या ११ वर्षांचा ‘हा’ चिमुकला घेतो UPSC चे क्लास; CM सुद्धा आहेत त्याच्या बुद्धिमत्तेचे चाहते

इतर खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now