केकेआरचा खेळाडू निगेटिव्ह काय आला? भाऊने तर डान्सच सुरू केला; पहा व्हिडीओ

 

क्रिकेटप्रेमींची आतुरता आता लवरकरच संपणार असून ९ एप्रिलपासून आयपीएल सुरु होणार आहे. पण आयपीएलमध्ये खेळणाऱ्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.

अशात आपली कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा हरभजनसिंगने भांगडा केला आहे. हरभजनचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हरभजन सिंग यंदा केकेआरकडून खेळताना दिसून येणार आहे. हरभजन सिंगची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, तसेच त्याचा क्वारंटाईनचा काळ सुद्धा पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्याने आनंदात भांगडा केला आहे. केकेआरने त्यांच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

एक व्यक्ती हरभजच्या रूमचा दार वाजवते,  तेव्हा तो बॅग घेऊन बाहेर येतो, तेव्हा त्याला कुठे जातोय असा प्रश्न केला जातो. हरभजन म्हणतो, माझी चाचणी झाली असून मी निगेटिव्ह आहे, आता मला सरावाला जात येणार आहे. असे म्हणत तो लगेच एका पंजाबी गाण्यावर डान्स सुरू करतो, असे या व्हिडीओमध्ये दिसून येते.

दरम्यान, सर्व संघ २०२१ च्या आयपीएलसाठी तयारीला लागल्यापासून आतापर्यंत तीन खेळाडुंना कोरोनाची लागण झाली आहे. आरसीबी संघाचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिकल, दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अक्षर पटेल आणि कोलकता नाईट रायडर्सच्या नितिश राणाला कोरोनाची लागण झाली आहे. पण आता नितीश राणाची रिपोर्ट निगेटिव्ह आली असून तो खेळण्यासाठी सज्ज असल्याची माहिती मिळाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.