कृष्ण कुमार कुन्नाथ उर्फ केके यांच निधन काल ३१ मे रोजी झाले. केकेनां कोलकत्यामध्ये सुरू असलेल्या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान त्यांना अचानक त्रास होऊ लागला होता. केके लाइव्ह कार्यक्रमामधून त्रास होत असल्यामुळे हॉटेलवर गेले होते.
कार्यक्रमादरम्यान केकेनां त्रास जाणवल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिली आहे. केकेंच्या जवळच्या मित्रांनी त्यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
केकेंची वयाच्या ५३व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली आहे. केकेंच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण मनोरंंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. गायकीच्या जोरावर केकेनी मोठा चाहता वर्ग तयार केला होता. त्याच्या पर्सनल लाईफबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.
केके यांनी त्याच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये २५ हजारापेक्षाही जास्त गाणी गायली आहेत. केकेंची गनना सर्वात महागड्या गायकांमध्ये केली जात होती. केकेंची एकूण संपत्ती १.५ दक्षलक्ष डॉलर्स इतकी आहे. केके एका गाण्यासाठी ५ ते ६ लाख रूपये घेत होते.
केके लाइव्ह कॉन्सर्टसाठी १० ते १५ लाख रूपये घेत होते. काही दिवसांपूर्वी केकेनी ऑडी कार देखील खरेदी केली होती. करोडोच्या मालमत्तेचे केके मालक होते. त्यांना घोडेस्वारीची देखील खूप आवड होती. केके आलिशान कारचे शौकीन होते.
केके यांनी हिंदीमधील अनेक हिट गाणी गायली आहेत. ‘खुदा जाने’, तू ही मेरी शब है’,’तडप तडप के’,आणि ‘यारो’ दोस्ती.. ही गाणी केकेनीं गायली आहेत. हिंदी शिवाय केके यांनी अनेक भाषातील गाण्यांना आवाज दिला आहे. त्यांना तेलूगू, तामीळ, कन्नड, मराठी, मल्याळम, बंगाली आणि गुजराती अशी अनेक भाषांमध्ये केके यांनी गाणी गायली आहेत.
महत्वाच्या बातम्या:-
महाराष्ट्र हादरला! पोटच्या ६ मुलांना ढकललं विहीरीत, सर्वांचा बुडून मृत्यु; कारण वाचून हादराल
फिल्टरपाडाच्या झोपडपट्टीत राहणारा गौरव मोरे कसा झाला हास्यजत्रेचा स्टार, वाचा यशोगाथा
मामाची मेहनत ‘अशी’ आली फळाला, UPSC पास करत भाचा झाला मोठा अधिकारी, वाचा यशोगाथा