Share

गायक केकेचा शेवटचा cctv व्हिडीओ आला समोर; पाहून तुमच्याही काळजात पाणी पाणी होईल

प्रसिद्ध गायक केके यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. गायक केके ५३ वर्षांचे होते. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये केके यांचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्ट दरम्यान गायक केके यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात डॉक्टरांनी गायक केके यांना मृत घोषित केले. ( KK last cctv footage video viral )

त्यांच्या निधनाने चित्रपट आणि संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. छातीत दुखत असल्यामुळे गायक केके यांनी कॉन्सर्ट अर्धवट सोडली होती. सध्या या कॉन्सर्टचे वेगवेगळे व्हिडिओ (Video) आणि फोटो समोर येत आहेत.

यादरम्यान गायक केके यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजचा आहे. यामध्ये गायक केके हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी हॉटेलच्या लॉबीमध्ये फिरताना दिसत आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये केके हॉटेलच्या लॉबीमध्ये काही व्यक्तींसोबत बोलत असल्याचे दिसत आहे.

हे सीसीटीव्ही फुटेज गायक केके यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीचे असल्याचे सांगितले जात आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये केके निरोगी असल्याचे दिसत आहे. पोस्टमॉर्टम अहवालानुसार गायक केके यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, “एका कार्यक्रमात परफॉर्म केल्यानंतर केके मंगळवारी रात्री हॉटेलमध्ये पोहचले होते. हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे केके यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी गायक केके यांना मृत घोषित केले. गायक केके यांच्या मृत्यूमागे कोणतेही षडयंत्र नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

केके यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. यांचा जन्म २३ ऑगस्ट १९७० रोजी केरळमधील त्रिशूर या ठिकाणी झाला. केके यांनी आपल्या गायन कारकिर्दीत २०० हून अधिक हिंदी गाणी गायली आहेत. याशिवाय त्यांनी तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, मराठी, बंगाली आणि गुजराती भाषेतही गाणी गायली आहेत. अनेक जाहिरातींच्या जिंगल्सनाही त्यांनी आपला आवाज दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
८ वर्षीय चिमुकल्याने आधी बाहुलीला फाशी दिली मग स्वत:ही घेतला गळफास, तपासात मोठा खुलासा
ट्रॉफी जिंकताच भाऊ क्रुणाल पांड्याने हार्दिकचे केले धुमधडाक्यात स्वागत, म्हणाला, माझ्या भावा…
अक्षता एकमेकांवर फेकण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये झाली हाणामारी, जाग्यावर मोडलं लग्न, वाचा सविस्तर..

ताज्या बातम्या मनोरंजन राज्य

Join WhatsApp

Join Now